
Pune : पुण्यातील खराडी भागात उच्चभ्रू सोसायटीतील रेव्ह पार्टीने पुन्हा एकदा पुणे हादरलंय. पण यामुळे राज्याचं राजकारणही तापलंय. कारण माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना या पार्टीतून अटक करण्यात आलीय. या कारवाईबद्दल पोलिस उपायुक्तांनी माहिती दिलीय... खराडी मधील 'आफ्टर पार्टी' पूर्वीही दोन पार्टया झाल्या होत्या. त्याची टाईमलाईन साम टीव्हीच्या हाती लागली...
'रेव्ह पार्टी'ची टाईमलाईन 'साम'च्या हाती
खराडी परिसरातील रेव्ह पार्टीपूर्वी 2 ठिकाणी पार्टी
कल्याणी नगरमधील पबमध्ये पार्टी
कल्याणी नगरमधील पब रात्री 1.30 वा. बंद
दुसरी पार्टी मुंढवा भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये
पंचतारांकित हॉटेलमध्ये 3 वाजेपर्यंत पार्टी
खराडी येथे स्टे बर्ड हॉटेलमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये पार्टी
पहाटे 5 ते 6 दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा छापा
घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का जप्त
खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 7 जण ताब्यात
दरम्यान गुन्हेगार असतील तर जावयाचं समर्थन नाही, असं विधान एकनाथ खडसेंनी केलयं. मात्र त्याच वेळी कुणाला अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. दुसरीकडे या कारवाईवरून मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंवर निशाणा साधलाय...
दुसरीकडे रोहित पवारांनी ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला खडसेंनी अडचणीत आणल्यानं राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी हे सगळं केलं जात नाही ना? असा सवाल उपस्थित केलाय. तर ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारेंनीही रेव्ह पार्टीचा बनाव करून खडसेंचा आवज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, असा आरोप केलाय..
पुण्यात यापूर्वीही ड्रग्ज साठा सापडलाय. तरुणाई नशेच्या विळख्यात सापडल्यानं चिंता व्यक्त होतेय. आता उच्चभ्रू सोसायटीतील रेव्ह पार्टी पुन्हा समोर आल्याने कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलं जातंय. मात्र खराडीतील रेव्ह पार्टीत खडसेंचे जावईच असल्यानं ही पार्टी पुढे काही दिवस राजकीय वातावरण गरम करणार यात शंकाच नाही. खडसे कुटुंब सत्ताधा-यांचा हल्ला कसा परतावायेत हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.