Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Kalyan Breaking : कल्याणकरांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसात पाच ते सहा घरे कोसळल्याची घटना घडली आहे.
kalyan News
kalyan Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडल्यानंतर आता आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे घरे कोसळल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या पूर्व भागातील कचोरे टेकडीवर सुमारे ५ ते ६ घरे कोसळली आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

kalyan News
Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील घरांखालची माती घसरल्याने घराची भिंत कोसळल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आजूबाजूच्या सहा ते सात घरांचा नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चार दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे टेकडीवरील माती ढासळल्याने ही दुर्घटना घडली. या दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पालिका प्रशासनाकडून या टेकडीवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत घरावर हातोडा मारण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सांगितले.

पावसाळ्यात कल्याण पूर्वेकडील नेतीवली ,कचोरे टेकडीवरील दरड कोसळण्याच्या तसेच घराखालची माती ढासळण्याच्या घटना अनेकदा घडतात. केडीएमसीकडून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नेतीवली ,कचोरे टेकडीवर राहणाऱ्या नागरिकांना नोटीस देत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण करण्याच्या सूचना दिल्या जातात.

kalyan News
Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

कल्याणमध्ये मागील चार दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने कल्याण पूर्वेकडे कचोरी टेकडीच्या मागील बाजूस असलेल्या गुरुग्राम आश्रमाजवळी टेकडीवरील काही घरांच्या खालची माती ढासळत असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. याच दरम्यान एका घराच्या मागील बाजूस असलेली भिंत कोसळली. माती घसरू लागताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. तर माती घसरू लागताच तातडीने रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली.

kalyan News
Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यासह आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोचत पाहणी केली. या भागात तीव्र उतारावर घरे उभारण्यात आली असून माती घसरल्यास किंवा खचल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून या आजूबाजूच्या सर्वच अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरु करण्यात आल्याचे मुंबरकर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com