Wrestlers Protest ANI
Sports

Wrestlers Protest : साक्षी, विनेश आणि बजरंगविरोधात पैलवानांनी का पुकारलं आंदोलन

Wrestlers Protest : महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या साक्षी,विनेश आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात ज्युनिअर पैलवानांनी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान या तिघांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात या तिघांनी आंदोलन केलं होतं.

Bharat Jadhav

Juniors Wrestlers Protest On jantr mantar Delhi:

भारतीय कुस्ती महासंघावरून वाद प्रकरणात नवीन वळण मिळालं आहे. महिला सुरक्षेसाठी लढा उभारणाऱ्या पैलवांनाविरोधातच आंदोलन होऊ लागलं आहे. साक्षी मलिक, बजरंग पूनिया आणि विनेश फोगाटच्या विरोधात इतर पैलवानांनी आंदोलन पुकारलंय. आज जंतर-मंतर मैदानावर शेकडो पैलवान येत त्यांनी या तिघांविरोधात आंदोलन सुरू केलं. (Latest News)

महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या या तिघांविरोधात ज्युनिअर पैलवानांनी (wrestler) आंदोलन पुकारलं. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन या तिघांविरोधात घोषणाबाजी केली. साक्षी मलिक, बजरंग पूनिया आणि विनेश फोगाट यांनी देशाच्या कुस्तीला उद्धवस्त केलं, अशा आशयाचे फलक ते दाखवत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, त्यांना या आंदोलनाची माहिती नव्हती. हे आंदोलनकर्ते ज्युनिअर पैलवानांमध्ये बागपतमधील छपरौली येथील ३०० लोक आले आहेत. यासह नरेलाच्या विरेंद्र कुस्ती अ‍ॅकॅडमीमधील काही लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या लोकांनी जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याच मैदानावर साक्षी, विनेश, बजरंग यांनी एक महिन्यापर्यंत आंदोलन केलं होतं. त्याच मैदानावर या ज्युनिअर पैलवानांनी आंदोलन केलं.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात या तिघांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांची हकालपट्टी केल्यानंतर कुस्ती महासंघाची निवडणूक झाली. या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांचा विजय झाला. याचा साक्षी, विनेश, बजरंग यांनी विरोध करत आपले पुरस्कार परत केले. परंतु आता त्याच्याविरोधातच ज्युनिअर पैलवानांनी आंदोलन पुकारलंय. या तिघांच्या आंदोलनामुळे कोणतीच स्पर्धा होत नाहीये. यामुळे भारतीय कुस्ती उद्धवस्त होत असल्याचा आरोप या पैलवानांकडून केला जात आहे.

या दरम्यान साक्षी मलिकने आरोप केलाय की, बृजभूषण शरण सिंह यांचे गुंड सक्रिय झाले असून ते तिला धमक्या देत आहेत.आमची सुरक्षा करणं सरकारची जबाबदारी असल्याची मलिक म्हणाली. बृजभूषण यांनी आपल्या राजकीय ताकदीने नॅशनल खेळांचे आयोजन केले. त्यानंतर ज्युनिअर पैलवानांचे करिअर खराब करत असल्याचा आरोप आमच्यावर करण्यात येत असल्याचं साक्षी मलिक म्हणाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT