Sports

IPL मध्ये राडा! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही शार्दूल फलंदाजीला उतरला, नेमकं कारण काय?

Mumbai Indians loss: वानखेडेवर CSK ने MI वर 103 धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्यात शार्दुल ठाकूर अचानक फलंदाजीला आल्याने सर्वजण चकित झाले. या घटनेमुळे आयपीएलमध्ये नवीन चर्चेला उधाण आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या सिझनमध्ये गुरुवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. ३३व्या या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत १०३ रन्सच्या मोठ्या फरकाने सीएसकेचा विजय झाला.

दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वजण चकित झाले. २०८ रन्सचं लक्ष्य गाठताना मुंबई इंडियन्सने सहावी विकेट पडल्यानंतर शार्दुल ठाकूरला फलंदाजीसाठी पाठवलं. मुख्य म्हणजे शार्दूचा प्लेईंग ११ मध्ये किंवा इम्पॅक्ट प्लेअरमध्येही समावेश नव्हता.

मुंबई टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तेव्हा त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असलेल्या मिचेल सँटनरला जसप्रीत बुमराहच्या १७ व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर कार्तिक शर्माचा कॅच घेताना दुखापत झाली.

सँटनरने कॅच घेतला पण त्यानंतर त्याला लगेचच मैदान सोडावं लागलं. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सने बदली खेळाडूला बोलावलं आणि सामन्याच्या मध्यातच शार्दुल ठाकूरला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं. दरम्यान शार्दुल ठाकूर फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि १२ चेंडूंमध्ये केवळ ६ रन्स करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

चेन्नई सुपर किंग्सने रन्सच्या फरकाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला असला तरी मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील रन्सच्या फरकाने हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. मुंबई इंडियन्सने आता पंजाब किंग्सला मागे टाकत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT