Sunil Gavaskar On Virat Kohli, Rohit Sharma Saam Tv
क्रीडा

Sunil Gavaskar: ते दोघं का खेळू शकत नाहीत? रोहित-विराटबाबतच्या निर्णयावर गावसकर भडकले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

येत्या ५ सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा फायनल सामना २२ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या या सीरीजमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. मात्र यामध्ये एक मोठी बाब म्हणजे या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) या स्पर्धेमध्ये खेळणार नाहीत. दरम्यान याच मुद्द्यावरून टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी दोन्ही खेळाडूंवर निशाणा साधला आहे.

सुनील गावसकर यांनी, दुलीप ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली का खेळू शकत नाहीत, असा सवाल केला आहे. क्रिकेटसाठी ही चांगली परिस्थिती नसल्याचं सुनील गावसकर यांचं म्हणणं आहे.

काय म्हणाले सुनील गावसकर?

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू बांगलादेशाविरूद्धच्या टेस्ट सीरीजचा भाग असणार आहे. हे दोन्ही खेळाडू टेस्ट सीरीजसाठी पूर्णपणे तयार राहावेत, असं प्रत्येकाला वाटतं. दुलीप ट्रॉफीसाठी सिलेक्टर्सने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं सिलेक्शन केलं नाही. त्यामुळे हे दोघं सरावाशिवाय टेस्ट सीरीजमध्ये खेळणार आहेत, असं गावस्कर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सुनील गावसकर यांनी जसप्रीत बुमराहबद्दल देखील वक्तव्य केलं आहे. सुनील गावसकर म्हणाले, जसप्रीत बुमराह ही सीरीज खेळत नाहीये, तर मी समजू शकतो. याचं कारण म्हणजे वर्कलोड मॅनेजमेंटशिवाय बुमराहला पाठदुखीची समस्याही सतावतेय.

गावस्कर पुढे म्हणाले की, कोणत्याही खेळामध्ये जर खेळाडू ३५ वर्षे किंवा त्याचं वय त्याहून अधिक असेल तर त्याने नियमित पद्धतीने खेळून स्वतःला फीट ठेवू शकतो. मात्र जर तुम्ही दीर्घकाळ खेळत नसाल तर, तुमच्या फीटनेसवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

भारत विरूद्ध बांगलादेशमध्ये रंगणार कसोटी मालिका

श्रीलंकेविरूद्धच्या सीरीजनंतर तब्बल दीड महिन्यानंतर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. चेन्नईमध्ये या दोन्ही टीममध्ये पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार असून, दुसरा टेस्ट सामना २७ सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT