Ajinkya Rahane News : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेचच आयपीएल २०२५ ला सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरु होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराशी संबंधित घोषणा केली. केकेआरने मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची कर्णधार म्हणून निवड केली. तर वेंकटेश अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली. कोलकाताने कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचीच निवड का केली? पाहा त्यामागील कारणे..
१. अजिंक्य रहाणेला कर्णधारपद सांभाळण्याचा मोठा अनुभव आहे. त्याने राजस्थान संघाचे आयपीएलमध्ये नेतृत्त्व केले होते. टीम इंडियाच्या कर्णधारपदाचाही रहाणेकडे दांडगा अनुभव आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकली होती. तो मुंबईच्या संघाचाही कर्णधार होता.
२. अजिंक्य रहाणे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रहाणेने सर्वात जास्त धावा केल्या होत्या. त्याने ८ डावात ५८ च्या सरासरीने आणि १६५ च्या स्ट्राईक रेटने ४६९ धावा केल्या होत्या. या स्पर्धेतली त्याची सर्वात मोठी खेळी ९८ धावांची होती. मुंबईने स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते.
३. अजिंक्य रहाणेला संघाला सांभाळण्याचे कौशल्य आहे. रहाणे अनुभवी देखील आहे. युवा खेळाडूंना त्याच्याकडून मार्गदर्शन मिळेल. अनेक बिकट परिस्थितीमध्ये तो खेळला आहे. बऱ्यात संघांकडून खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. प्रत्येक संघाच्या चांगल्या आणि वाईट बाजू त्याला ठाऊक आहेत.
४. अजिंक्य रहाणे आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रहाणे खेळला आहे. चंद्रकांत पंडित हे मुंबई संघाचेही प्रशिक्षक होते.
५. कोलकाता नाईट रायडर्सकडे कर्णधारासाठी चांगला पर्याय उपलब्ध नाहीये. वेंकटेश अय्यरकडे कर्णधारपदाचा अनुभव नाहीये. नरेन आणि रसेल यांच्याकडे कर्णधारपद देता येणार नाही. अय्यरप्रमाणे रिंकू सिंहकडेही नेतृत्वाचा अनुभव नसल्याने त्याच्याकडेही कर्णधारपद देता येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.