Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा फिट आहे, लठ्ठपणाच्या पोस्टवर बीसीसीआयने मौन सोडलं; सचिव म्हणाले, 'खेळाडू निराश...'

Rohit Sharma Fitness Controversy : काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मा जाड आहे असे म्हणत एक्सवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर बीसीसीआयच्या सचिवांना प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma Fitness Controversy
Rohit Sharma Fitness Controversy X (Twitter)
Published On

Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. अशातच एका काँग्रेसच्या नेत्याने रोहित शर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी 'खेळाडू म्हणून रोहीत शर्मा खूपच जाडा आहे. रोहितला वजन कमी करण्याची गरज आहे. तो भारताचा सर्वात खराब कर्णधार देखील आहे' असे एक्स पोस्टमध्ये म्हटले होते.

शमा मोहम्मद यांनी एक्सवर पोस्ट करत रोहित लठ्ठ असल्याचे म्हटले होते. या पोस्टवरुन नव्या वादाला सुरुवात झाली. फक्त क्रिकेट जगतातीलच नाही तर राजकीय आघाडीवरील नेत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी शमा मोहम्मद यांच्यावर टीका केली. दरम्यान या प्रकरणावर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवजित सैकिया यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. ते म्हणाले, 'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना क्षुल्लक टिप्पणी करणे फारच दुर्देवी आहे. याचा एका व्यक्तीवर किंवा संपूर्ण संघावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे खेळाडू निराश होऊ शकतात. सर्व खेळाडू त्यांच्या क्षमतेनुसार खेळ करत आहेत. वैयक्ति प्रसिद्धीसाठी अपमानास्पद वक्तव्य करु नये.'

Rohit Sharma Fitness Controversy
Team India Playing XI: एका खेळाडूमुळे रोहितची डोकेदुखी वाढली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार?

रोहित शर्मावरील टिप्पणी असलेली पोस्ट शमा मोहम्मद यांनी डिलीट केली आहे. पोस्टद्वारे त्यांनी बॉडी शेमिंग केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहेत. या प्रकरणावर शमा यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, मी फिटनेसबद्दल सामान्य पोस्ट केली होती. ते बॉडीशेमिंग नव्हते. खेळाडू तंदुरुस्त असावा असे मला वाटते. मी रोहितची तुलना मागील कर्णधारांशी केली होती. बोलण्याचा मला अधिकार आहे. आपल्याकडे लोकशाही आहे.

Rohit Sharma Fitness Controversy
KKR Captain: केकेआरचा कॅप्टन ठरला! मराठमोळ्या खेळाडूकडे सोपवली मोठी जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com