Hardik Pandya MI Playing 11 saam tv
Sports

GT vs MI: हार्दिक पंड्याच्या कमबॅकनंतर कोणाचा पत्ता होणार कट? पाहा गुजरातविरूद्ध कशी असेल MI ची प्लेईंग 11

Hardik Pandya MI Playing 11: पंजाबविरुद्धच्या लढतीत गुजरात टायटन्सची बॅटिंग चांगली होती. मात्र, त्यांच्या गोलंदाजांना प्रभावी प्रदर्शन दाखवता आलं नाही. आजच्या सामन्यात मुंबई आणि गुजरातची प्लेईंग ११ कशी असणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२५ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. दोन्ही टीमसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. याचं कारण म्हणजे या दोन्ही टीम्सने त्यांचे पहिले सामने गमावले आहेत. मुंबईच्या टीमसाठी सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याचं कमबॅक. एका सामन्याची बंदी संपल्यानंतर आता पंड्या टीमचं नेतृत्व करणार आहे.

गुजरातच्या टीममध्ये काय आहेत अडचणी?

पंजाबविरुद्धच्या सिझनमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सची फलंदाजी चांगली होती. पण त्याच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. विशेषतः भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना साजेसा खेळ करता आला नाही. अशा परिस्थितीत त्याला या सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर काम करावं लागेल.

गुजरातच्या टीममध्ये वॉशिंग्टन सुंदरसारखा गोलंदाजही आहे. पण इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे त्याला किती संधी मिळू शकते हे पाहावं लागणार आहे. दरम्यान गुजरातची फलंदाजी मजबूत आहे. पण गेल्या सामन्यात रदरफोर्डने ज्या पद्धतीने संघर्ष केला होता ते पाहता ग्लेन फिलिप्सला संधी मिळू शकते.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग ११

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, शेरफेन रदरफोर्ड/ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, आर साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

मुंबई मारणार का बाजी?

गेल्या सामन्यात मुंबईच्या टीमला काही खास कामगिरी करता आली नाही. मात्र हार्दिकचं कमबॅक झाल्यानंतर त्याच्यासाठी गोष्टी खूप सोप्या होणार आहेत. मुंबईची चिंता रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीची आहे . जर हे दोन्ही फलंदाजांनी त्यांचा सर्वोत्तम खेळ दाखवला तर मुंबईला रोखणं सोपं राहणार नाही.

गोलंदाजीमध्ये या सामन्यातही सर्वांच्या नजरा विघ्नेश पुथूरवर असणार आहेत. परंतु फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर विघ्नेशसाठी सोपं नसणार आहे. यावेळी टीममध्ये एक बदल निश्चित आहे. हार्दिक पंड्याच्या कमबॅकमुळे रॉबिन मिंजला प्लेईंग ११ मधून बाहेर बसावं लागू शकतं.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा, रेयान रिकलटन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सैंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, एस राजू, विग्नेश पुथुर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

SCROLL FOR NEXT