Shruti Vilas Kadam
कियारा सकाळी उठल्यावर माईल्ड क्लींझरने चेहरा स्वच्छ करते, ज्यामुळे त्वचेत साचलेले घाम, धूळ आणि तेल निघून जातं.
ती भरपूर पाणी पिण्यावर आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यावर भर देते. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि मऊ राहते.
कियारा अडवाणी दररोज SPFयुक्त सनस्क्रीन वापरते, जे त्वचेला सूर्यप्रकाशातील हानिकारक UVA/UVB किरणांपासून वाचवते.
तिचं सौंदर्य रूटीन केवळ बाह्य नव्हे तर आतूनही स्वच्छतेवर आधारित आहे. ती हिरव्या भाज्या, फळं आणि गरम पाणी नियमित घेते.
कियारा अडवाणी आठवड्यातून १–२ दिवस मेकअपपासून दूर राहते, जेणेकरून त्वचेला श्वास घेता येतो आणि नैसर्गिक तेलांचा समतोल राखला जातो.
ती बेसन, दही आणि हळदीचा फेस पॅक अधूनमधून वापरते, जे त्वचेला एक्सफोलिएट व उजळ बनवतं.
तिच्या त्वचेच्या तेजामागे योगाभ्यास, मेडिटेशन आणि ७–८ तासांची झोप हे महत्वाचे घटक आहेत.