Shreya Maskar
पालक करी बनवण्यासाठी पालक, कांदा, टोमॅटो, लसूण, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे, तेल, मीठ, गरम मसाला आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
पालक करी बनवण्यासाठी पालक स्वच्छ धुवून चिरून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाका.
जिरे तडतडल्यावर कांदा आणि लसूण घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
यात आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.
मिश्रणात हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि मीठ घालून छान मिक्स करा.
शेवटी चिरलेला पालक घालून चांगले शिजवून घ्या.
पालक करीवर कोथिंबीर घालून गरमागरम चपातीसोबत आस्वाद घ्या.