kl rahul and shreyas iyer saam tv
Sports

Asia Cup 2023: राहुल, अय्यर नव्हे तर चौथ्या क्रमांकावर खेळणार 'हा' फलंदाज; कर्णधार रोहितने केला मोठा खुलासा

Rohit Sharma Statement: कर्णधार रोहित शर्माने चौथ्या क्रमांकावर खेळण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Asia Cup 2023 Rohit Sharma Statement On No. 4 Batting Position:

आशिया चषक २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ३० ऑगस्टपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवसारख्या फलंदाजांना संधी दिली गेली आहे. मात्र भारतीय संघासमोर एक प्रश्न अजूनही कायम आहे. तो म्हणजे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येणार? याबाबत आता कर्णधार रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने म्हटले की, ' मुख्य निवडकर्ते अजित आगरकर सध्या नवीन आहेत. त्यांना माहीत नाही की, यापूर्वी काय होत होतं. मला जितकं होऊ शकेल तितकं मी त्यांना अपडेटेड ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.मला एकच म्हणायचं आहे की, प्रत्येक खेळाडूने कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार राहावं. ही एकच गोष्ट आहे जी आम्हा सर्वांना लक्षात ठेवावी लागेल. कारण आता खेळण्याची पद्धत बदलली आहे. '

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मला माहितेय की, तुमच्यासाठीही हे समजणं कठीण आहे की जो फलंदाज सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो तो चौथ्या क्रमांकावर का फलंदाजी करतोय. त्यांना आदेश दिले गेले आहेत हे एका रात्रीत मुळीच झालं नाही. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे, क्लब क्रिकेट नाही. असं मुळीच नाही की, आम्ही झोपताना एखाद्या फलंदाजाला विशिष्ठ क्रमांकावर फलंदाजी करायला सांगतो आणि झोपेतून उठल्यानंतर त्याचा फलंदाजी क्रम बदलतो. (Latest sports updates)

कोण करणार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी?

आशिया चषक स्पर्धेतून केएल राहुल आणि श्रेयस अय्यर कमबॅक करताना दिसून येणार आहे. ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब असणार आहे. कारण या फलंदाजांच्या येण्याने भारतीय संघाचा मध्यक्रम मजबूत झाला आहे.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' आमच्याकडे असे फलंदाज आहेत जे कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. त्यामुळे प्रश्न केवळ नंबर ४ चा नाही. आव्हानं आली आहेत आणि त्यांच्यावर अनेकदा दबाव टाकण्यात आला आहे ही चांगली बाब आहे. दुर्दैव असं की, आमचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने आम्हाला दुसऱ्या खेळाडूंना आजमावून पाहावं लागलं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT