Indian Team For Asia Cup 2023:
अखेर आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी १७ खेळाडूंची निवड केली आहे. मात्र या संघाची घोषणा करत असताना ब्रॉडकास्टरकडून एक मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या एका ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या ह्रदयाची धडधड वाढली होती.
८ मिनिटात बदलला भारतीय संघ..
तर झाले असे की, सोमवारी दुपारी १.२६ मिनिटांनी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र या संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरकडून मोठी चूक झाली. या संघात युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलचं नाव नव्हतं. आशिया चषकासाठी शुबमन गिल भारतीय संघात नसल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केली. ज्यात शुबमन गिलचं नाव होतं. ही चूक १.३६ मिनिटांनी दुरुस्त करण्यात आली.
आशिया चषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव). (Latest sports updates)
असे आहे वेळापत्रक
आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - ३० ऑगस्ट
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ३१ ऑगस्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान - २ सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - ३ सप्टेंबर
भारत विरुद्ध नेपाळ - ४ सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - ५ सप्टेंबर
सुपर-४ सामने
अ १ विरुद्ध ब २ - ६ सप्टेंबर
ब १ विरुद्ध ब २ - ९ सप्टेंबर
अ १ विरुद्ध अ २ - १० सप्टेंबर
अ २ विरुद्ध ब १ - १२ सप्टेंबर
अ १ विरुद्ध ब १ - १४ सप्टेंबर
अ २ विरुद्ध ब २ - १५ सप्टेंबर
अंतिम - १७ सप्टेंबर
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.