yashasvi jaiswal twitter
Sports

Yashasvi Jaiswal सोबत दिसणारी ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

Yashasvi Jaiswal Girl Friend: यशस्वी जयस्वालसोबत एका मिस्ट्री गर्लचा फोटो तुफान व्हायरल होतोय ती नक्की आहे तरी कोण?

Ankush Dhavre

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघ भारतीय संघ तिसऱ्यांदा फायनलमध्ये खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे.

दरम्यान या स्पर्धेतील गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकावी लागणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी यशस्वी जयस्वालचाही संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

यशस्वी जयस्वालला २०२३ मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यातील पहिल्याच डावात त्याने शतक झळकावलं. त्यानंतर टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपलं स्थान निश्चित केलं.

मैदानावरील कामगिरीसह जयस्वाल आपल्या वैयक्तिक कारणास्तव देखील चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो मिस्ट्री गर्लमुळे चर्चेत आला आहे. त्याचा एका मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो सोशल मीडिआवर तुफान व्हायरल होतोय.

ती मिस्ट्री गर्ल कोण?

तुम्ही सोशल मीडिया थोडं जरी स्क्रोल केलं, तर तुम्हाला यशस्वी जयस्वालचा एका तरुणीसोबतचा फोटो नक्कीच दिसेल. या तरुणीचं नाव मॅडी हॅमिल्टन असं आहे. तिच्यासोबतचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मॅडी हॅमिल्टन आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात अफेअर सुरु असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र यात कुठलंही तथ्य नसल्याचं म्हटलं जात आहे. कारण दोघांकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.

मॅडी हॅमिल्टन बद्दल बोलायचं झालं, तर ती युकेमध्ये राहते. यापूर्वीही दोघांचे एकत्रित असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जेव्हा जेव्हा सुट्ट्या असतात, त्यावेळी हे दोघेही एकत्र दिसून येतात.

यशस्वी जयस्वालची शानदार कामगिरी

यशस्वी जयस्वालने भारतीय संघासाठी आतापर्यंत शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन काही महिनेच झाले आहेत. या छोट्याशा कारकिर्दीत त्याने अनेक मोठ मोठे कारनामे करुन दाखवले आहेत. यावर्षी सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT