Who is Manu Bhaker Saam Tv
Sports

Who is Manu Bhaker: भारताचं ऑलिम्पिकचं एक मेडल पक्कं? एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरी गाठणारी मनू भाकर कोण आहे?

Paris Olympics 2024 : भारतीय नेमबाज मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी तिचे लक्ष्य पदकासाठी असेल.

साम टिव्ही ब्युरो

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळू शकतं. भारतीय नेमबाज मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी तिचे लक्ष्य पदकासाठी असेल. मात्र याच स्पर्धेत भारताचा आणखी एक नेमबाज रिदम सांगवान अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही.

दरम्यान, मनू भाकर टोकियो 2020 मध्ये याच स्पर्धेत 12 वे स्थान पटकावले होते आणि आता ती पदकाच्या शर्यतीत आहे. मनू भाकरने पात्रता स्पर्धेत 600 पैकी 580 गुण मिळवले. ती यात तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

कोण आहे मनू भाकर?

मनू भाकर ही हरियाणातील झज्जरमधील गोरिया गावची रहिवासी आहे. तिचे वडील राम किशन भाकर मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. शूटिंगआधी मनूने कराटे, थांग टा, स्केटिंग, स्विमिंग आणि टेनिस स्पोर्ट्सही खेळली आहे. मनूने कराटे आणि थांग टा या प्रकारात राष्ट्रीय पदक जिंकलं आहे. स्केटिंगमध्येही तिने पदक मिळवलं आहे.

नेमबाबजीत कशी आली मनू?

मिळालेल्या माहितीनुसार, एकदा मनू तिच्या वडिलांसोबत शूटिंग रेंजमध्ये फिरत होती. त्यावेळी अचानक तिने शूटिंग सुरू केली. तिने बरोबर 10 नंबरला टार्गेट केलं. हे पाहून वडिलांनी मनूला शूटिंग करायला प्रोत्साहन दिलं. राष्ट्रीय प्रशिक्षक यशपाल राणा यांनी मनूला नेमबाजीचे धडे दिले, ज्याचा परिणाम म्हणून आज ऑलिम्पियन मनू भाकर आपली प्रतिभा जगाला दाखवत आहे.

दरम्यान, मनू भाकर गेल्या 8 वर्षांपासून शूटिंग करत आहे. तिने 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मनूने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला आणि 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT