कोण आहे आरसीबीचा नवा मालक?
आर्यमन बिर्ला होणार आरसीबी फ्रँचायझीचा चेअरमन
संपत्ती विराट कोहलीपेक्षाही जास्त
आयपीएल २०२६ सुरु होण्यापूर्वीच आता आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची विक्री झाली आहे.आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोनच्या पर्पेच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी यांनी संयुक्तपणे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची फ्रँचायजी घेतली आहे. तब्बल १.७८ डॉलर्स म्हणजे १६००० कोटींपेक्षा जास्त रुपयांना हा संघ विकत घेण्यात आला आहे.
आयपीएल करार डायजिओची यूके उपकंनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडसोबत झाली, सध्या मालकी डायजिओकडे आहे. आता नवीन करारानंतर, आरसीबीच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघाचा १०० टक्के हिस्सा विकत घेण्यात आली आहे. आरसीबी विकत घेतल्यानंतर आर्यमन बिर्ला फ्रँचायझीचे नवीन चेअरमन बनू शकतात.
आर्यमन बिर्ला आहेत तरी कोण? (Who is Aryaman Birla RCB Owner)
आर्यमन बिर्ला यांनी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासोबस ड्रेसिंग रुम शेअर केली आहे. आर्यमान बिर्ला हे कुमार मंगलम यांचे चिरंजीव आहे. त्यांचे वय २८ वर्ष आहे. ते माजी क्रिकेटरदेखील आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघाकडून ते देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. आर्यमन यांनी नौ फर्स्ट क्लासमध्ये ४१४ धावा केल्या होत्या. मात्र, आर्यमन यांनी काही आरोग्याच्या समस्यांमुळे क्रिकेटपासून ब्रेक घेतला. यानंतर आता ते बिझनेसमॅन म्हणून काम करत आहे.
आर्यमन यांचा जन्म १९९७ रोजी मुंबई झाला. त्यांनी २०१७ मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. ते सुरुवातीला रणजी ट्रॉफीसाठी खेलले. आर्यमन यांनी काही काळानंतर क्रिकेट सोडले. यानंतर २०२३ मध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडमध्ये संचालक म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी ग्रासिम इंडस्ट्रीज आणि आदित्य बिर्ला मॅनेजमेंटमध्ये संचालक पदावर काम करत आहेत. ते आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहेत.
सचिन, धोनी, विराट कोहलीपेक्षा जास्त संपत्ती (RCB New Owner Aryaman Birla Net Worth)
आर्यमन बिर्ला यांची संपत्ती ७०,००० कोटींच्या घरात आहे. ही संपत्ती विराट कोहली, धोनी आणि सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त आहे. सचिन तेंडुलकरची संपत्ती १,२५० ते १,५०० कोटी आहे. धोनीची संपत्ती १००० कोटी रुपये आहे तर कोहलीची संपत्ती १००० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. त्यापेक्षा जास्त संपत्ता आर्यमन बिर्ला यांची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.