team india twitter
क्रीडा

Team India: टीम इंडिया भारतात केव्हा येणार? परतल्यानंतर कसं असेल नियोजन? जाणून घ्या

Ankush Dhavre

भारतीय संघाने १७ वर्षांची प्रतीक्षा संपवत अखेर टी -२० वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. हा सामना बारबाडोसमध्ये पार पडला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर सोमवारी भारतीय संघ भारतात येण्यासाठी रवाना होणार होता. मात्र बेरीयल चक्रीवादळामुळे भारतीय खेळाडू अजूनही बारबाडोसमध्येच आहेत.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ सोमवारी न्यूयॉर्कसाठी रवाना होणार होता. न्यूयॉर्कवरून दुबई आणि त्यानंतर भारतीय खेळाडू दिल्लीत दाखल होणार होते. मात्र बेरीयल चक्रीवादळामुळे बारबाडोसचं आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय प्रधानमंत्री मिया मोटले यांनी घेतला आहे. असं म्हटलं जात आहे की, भारतात आल्यानंतर भारतीय खेळाडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारतीय संघाचा शानदार विजय

भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करत टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने फायनलमध्ये अफगाणिस्तानला एकतर्फी नमवत फायनलचं तिकीट मिळवलं. फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पार पडली. या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. यासह त्याला अक्षर पटेलनेही चांगली साथ दिली. दोघांनी मिळून ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने १७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ७ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT