Team India twitter
Sports

Team India Victory Parade: मुंबईत होणार भारताच्या विजयाचा जल्लोष! घरबसल्या व्हा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार; इथे पाहा LIVE

T20 World Cup 2024 Winner Team India's Victory Parade Live Streaming Details: भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष मुंबईत होणार आहे. दरम्यान या सोहळ्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार जाणून घ्या.

Ankush Dhavre

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकरच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. भारतीय खेळाडू बुधवारी दुपारी ३ वाजता बारबाडोसहून भारतात येण्यासाठी रवाना झाली. एअर इंडियाचं स्पेशल चार्टर्ड विमान भारतीय खेळाडू, बीसीसीआय स्टाफ, सपोर्ट स्टाफ आणि क्रीडा पत्रकारांना घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता दिल्लीत दाखल झालं आहे. दरम्यान भारतात आल्यानंतर भारतीय संघाची विजयी रॅली काढली जाणार आहे. दरम्यान हा इव्हेंट लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

मुंबईकरांना २००७ टी-२० वर्ल्डकप विजयी रॅलीपेक्षाही भव्य रॅली पाहायला मिळणार आहे. हा सोहळा आणखी शानदार करण्यासाठी मुबंईतील नरीमन पॉईंटपासून ते मरिन ड्राईव्हपर्यंत भव्य ओपन बस रॅली काढण्यात येणार आहे. यापूर्वी २००७ मध्ये झालेल्या विजयी रॅलीमध्येही लाखो क्रिकेट फॅन्सने हजेरी लावली होती. यावेळीही असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं असा अंदाज वर्तवला जात आहे.

भारतीय संघ दिल्लीत किती वाजता दाखल झाला?

भारतीय संघ गुरुवारी सकाळी ६ वाजता दिल्लीतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला आहे.

नरेंद्र मोदींची भेट केव्हा आणि किती वाजता होणार?

दिल्लीत दाखल झाल्यानंतर भारतीय खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. यासह नरेंद्र मोदी खेळाडूंसह नाश्ता करणार आहेत.

कुठे होणार विजयी परेड?

भारतीय संघ मोदींची भेट घेतल्यानंतर दिल्लीहून मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईतील नरीमन पॉईंटपासून ते मरीन ड्राईव्हपर्यंत ही विजयी परेड काढली जाणार आहे.

किती वाजता सुरु होणार विजयी परेड?

भारतीय संघाची विजयी परेड संध्याकाळी ५ वाजता सुरु होणार आहे.

कुठे पाहता येईल लाईव्ह?

भारतीय संघाची विजयी परेड हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहे. यासह युट्यूबवरही लाईव्ह पाहता येणार आहे.

टीव्हीवर कुठे पाहता येणार लाईव्ह?

भारतीय संघाच्या विजयी परेडचं लाईव्ह टेलिकास्ट हॉटस्टार आणि स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT