team india twitter
Sports

IND vs BAN: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत- बांगलादेश दुसरा कसोटी सामना? संघही ठरला!

India vs Bangladesh 2nd Test Match Details: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणारा दुसरा कसोटी सामना केव्हा, अन् कुठे होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs BAN 2nd Test Match Details: चेन्नईच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. आर अश्विनच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर आणि रिषभ- शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. हा सामना भारतीय संघाने २८० धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना केव्हा होणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठे होणार आहे?

या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना किती वाजता सुरु होईल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना सकाळी ९:३० वाजता सुरु होईल.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना Viacom 18 चॅनेलवर लाईव्ह पाहता येईल.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर फुकटात पाहता येईल. यासह तुम्ही या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स www.saamtv.esakal.comवर मिळवू शकता.

या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे बांगलादेशचा संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

पालिका निवडणुकीत पैशांचा पूर? तुमच्या मताचा रेट किती?

SCROLL FOR NEXT