csk vs gt  saam tv
Sports

GT vs CSK Qualifier 1: गुरु की शिष्य...कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा आकडेवारी काय म्हणतेय

GT vs CSK Match Details: स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील क्वालिफायर १ चा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. ४ वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज संघ १ वेळ चॅम्पियन असलेल्या गुजरात सोबत दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचं झालं तर गुजरातचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या तर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये टॉप २ मध्ये राहण्याचा फायदा असा की, क्वालिफायर १ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळेल.

गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता. तर चेन्नई सुपर किंग्ज हा दुसरा संघ ठरला होता.

तर लखनऊ सुपर जायंट्स तिसरा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्स हा प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ ठरला होता. या दोन्ही संघांची आकडेवारी पाहीली तर हे दोन्ही संघ ३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्स संघाने तीनही सामने जिंकले आहेत. (Latest sports updates)

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना केव्हा पार पडणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना २३ मे रोजी खेळला जाणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना केव्हा सुरू होईल?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० सुरू होईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज कुठे रंगणार आहे?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना लाईव्ह कुठे पाहू शकता?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. तसेच जियो सिनेमावर हा सामना तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला www.saamtv.com वर मिळतील.

अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, वृद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, यश दयाल, मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज: डेवोन कॉनव्हे ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, महीष थिक्षणा, मथीषा पथिराना, तुषार देशपांडे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT