IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले आहेत. आता प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. रविवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
सामन्यात गुजरात टायटन्स संघाने बाजी मारली आणि ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी करत सर्वांची मनं जिंकली. यासह त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रॉयल चॅलेंजर्स संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याची ही जादु आयपीएल २०२३ स्पर्धेतही पाहायला मिळाली आहे.
त्याने या स्पर्धेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सलग २ शतके झळकावली आहेत. यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. तर गुजरात टायटन्स संघाविरुद्व झालेल्या सामन्यात देखील त्याने जोरदार शतक झळकावलं आहे.
विराटचे विक्रमी शतक..
गुजरात टायटन्स संघाविरुद्व झालेल्या सामन्यात विराट कोहलीने ६१ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ७ वे शतक आहे.
यासह त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम मोडून काढला आहे. ७ शतकांसह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावे होता.
ख्रिस गेलने ६ शतके झळकावली होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शतक झळकावत त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली होती. (Latest sports updates)
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज..
विराट कोहली - ७ शतके
ख्रिस गेल- ६ शतके
जोस बटलर - ५ शतके
केएल राहुल - ४ शतके
डेव्हिड वॉर्नर - ४ शतके
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज...
विराट कोहली - ७२६३ धावा
शिखर धवन - ६६१७ धावा
डेव्हिड वॉर्नर-६३९७ धावा
रोहित शर्मा- ६१९२ धावा
सुरेश रैना - ५५२८ धावा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.