Reasons of RCBs Failure: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ, हा संघ नसून एक भावना आहे असं क्रिकेट फॅन्स म्हणतात. आयपीएल स्पर्धेला २००८ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून हा संघ या स्पर्धेत खेळतोय आतापर्यंत १६ हंगाम होऊन गेले. मात्र या संघाला एकही जेतेपद मिळवता आलं नाही.
या संघात वर्ल्ड क्लास खेळाडू आले आणि गेले, मात्र तरीदेखील हा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकला नाही. नेमकं गंडतंय तरी कुठं? काय आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची ट्रॉफी न जिंकण्याची कारणं? याचाच घेतलेला एक आढावा.
संघ बांधणी:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ नेहमीच स्टार खेळाडूंनी सजलेला असतो. विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स, ख्रिस गेल, डू प्लेसिस सारखे खेळाडू मैदानात उतरणार, याच भीतीने विरोधी संघातील खेळाडू थरथर कापतात. हे खेळाडू संघासाठी जीव ओतून टाकतात. मात्र तरीदेखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची संघ बांधणी चुकतेय असं म्हणावं लागेल.
कारण ४-५ स्टार खेळाडू सोडले तर उर्वरित खेळाडू संघाच्या विजयात योगदान देण्यात कुठंतरी कमी पडतात. हेच कारण आहे की, हा संघ कागदावर मजबूत असूनही मैदानात साजेशी कामगिरी करू शकत नाही.
एखादा संघ स्पर्धेत कशी कामगिरी करणार हे लिलावातच कळून जातं. कारण इथे संघाची निवड चुकली की, ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नं पाहायचंच नाही.
वरचे फलंदाज नेहमी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी चांगली कामगिरी करतात. मात्र मध्य क्रम आणि लोवर ऑर्डर हा चिंतेचा विषय राहिला आहे. वरचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज योगदान देत नाही.
गोलंदाजी देखील या संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. या संघातील गोलंदाज शेवटच्या षटकांमध्ये धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे या संघाला संघाची निवड करताना फलंदाज आणि गोलंदाजांचा समतोल कसा राखता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. (Latest sports updates)
स्टार खेळाडूंवर असलेला प्रेशर:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू असतात. या खेळाडूंवर संघाला जेतेपद जिंकून देण्याचा प्रेशर असतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आतापर्यंत ३ वेळेस अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
मात्र या संघाला जेतेपद मिळवता आले नाहीये. या संघात ख्रिस गेल, एबी डीव्हीलियर्स सारखे खेळाडू होऊन गेले. या खेळाडूंवरही संघाला जेतेपद जिंकून देण्याचा प्रेशर होता. या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली.
मात्र या खेळाडूंना इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. सातत्य ठेवता येत नसल्याने या संघाला प्लेऑफमध्ये जाऊन बाहेर पडावं लागतं.
योग्य प्लेइंग ११ ची निवड न करणं ..
या संघात आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. १६ वर्षे होऊन गेली तरीदेखील या संघाला मॅच विनिंग कॉम्बिनेशन मिळालं नाहीये. २०१९ मध्ये झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या १४ सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये ८ बदल केले होते.
तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सारखे संघ खेळाडूंना बॅकअप करत असतात. एखादा खेळाडू जर चांगली कामगिरी करत नसेल तर हे संघ त्या खेळाडूंना बाहेर न करत खेळण्याची संधी देतात.
जेणेकरून त्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढेल आणि तो खेळाडू कमबॅक करू शकतो. याबाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ कुठेतरी मागे पडतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.