ashes 2023 saam tv
क्रीडा

Eng vs Aus,Ashes 2023: कुठे, केव्हा आणि कधी रंगणार Ashes मालिकेचा थरार? संपुर्ण माहिती जाणून घ्या एकाच Click वर

Ashes 2023: आता कसोटी क्रिकेटमधील मानाची मालिका म्हणजे अॅशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

England vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. हा सामना झाल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमधील मानाची मालिका म्हणजे अॅशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज (१६ जून) पासून सुरु होणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्यानंतर नक्कीच ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास वाढला असणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

दोन्ही बलाढ्य संघ असल्यामुळे चाहत्यांना हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळू शकतात. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कुठे आणि कधी खेळवला जाणार आहे हा सामना.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठे खेळवला जाणार आहे?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी बर्मिंगहॅमच्या एजबस्टन स्टेडियमवर रंगणार आहे.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी किती वाजता सुरू होईल?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी भारतीय वेळेनुसार ३:३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ३ वाजता केले जाईल.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी लाईव्ह कुठे पाहता येणार?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर ऑनलाईन स्ट्रिमिंग Sony LIV app वर पाहता येईल.

तर या सामन्याचे अधिक अपडेट्स तुम्ही www.saamtv.com वर मिळवू शकता. (Latest sports updates)

इंग्लंडने सामना सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे.

या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंड संघाची प्लेइंग ११:

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिनसन आणि जेम्स अॅेडरसन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT