Hardik Pandya, Mumbai Indians SAAM TV
Sports

Hardik Pandya Captaincy : मुंबई संघात याच आठवड्यात मोठा उलटफेर? माजी क्रिकेटपटूचं हार्दिक पंड्याबाबत मोठे वक्तव्य

Mumbai Indians in IPL 2024 : सलग तीन सामन्यांत पराभूत होणाऱ्या मुंबई इंडियन्समध्ये येत्या काही दिवसांत मोठा उलटफेर होऊ शकतो, असे संकेत माजी क्रिकेटपटूने दिले आहेत.

Nandkumar Joshi

Mumbai Indians Captain Hardik Pandya :

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या सलग तीन सामन्यांत पराभूत होणाऱ्या मुंबई इंडियन्समध्ये येत्या काही दिवसांत मोठा उलटफेर होऊ शकतो, असे संकेत माजी क्रिकेटपटूने दिले आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानात राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाल्यानंतर मनोज तिवारीनं हार्दिक पंड्याबाबत मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सहा दिवसांनी होणार आहे. या सहा दिवसांच्या आतच हार्दिक पंड्याचं कर्णधारपद जाऊ शकतं, असं तो म्हणाला. पण तिवारीचं हे बोलणं वीरेंद्र सेहवागला खटकलं. तिवारीनं अशा प्रकारचं वक्तव्य करताना खूप घाई केली, असं सेहवाग म्हणाला.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) या दोन संघात सोमवारी वानखेडे मैदानात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या सामन्याच्या निकालानंतर हार्दिक आणि त्याच्या नेतृत्वावर शंका उपस्थित होऊ लागली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला आयपीएल हंगामाच्या मध्यावधीतच पदावरून हटवू शकतात, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.

रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याकडे नेतृत्व दिल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड नाराज आहेत. हार्दिकलाही प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यात हार्दिकच्या नेतृत्वात सलग तीन पराभव झाल्यानंतर चाहत्यांचा संताप आणखी वाढलेला दिसतोय. मुंबईला कर्णधार म्हणून पाच वेळा जेतेपद पटकावून देणारा रोहित शर्मा या मोसमात मात्र फलंदाज म्हणून खेळतोय. ही बाब चाहत्यांच्या पचनी पडलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पहिल्या सामन्यापासून हार्दिक पंड्याची हूटिंग केली जात आहे.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर 'क्रिकबझ'वर मनोज तिवारी आणि वीरेंद्र सेहवाग यांनी निकालावर चर्चा केली. मनोज तिवारी म्हणाला की, 'मला ठाऊक आहे की मी खूप मोठं विधान करण्याचं धाडस करत आहे. मुंबईला या सामन्यानंतर सहा दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. पुढच्या सामन्याच्या आधी हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) कर्णधारपद गमवावं लागू शकतं. हार्दिककडून नेतृत्व करताना चुका झाल्या आहेत. गोलंदाजीत बदल असो वा मग फलंदाजी क्रम बदलाबाबत.'

'हार्दिकने घरच्या मैदानात गोलंदाजी केली नाही. तिथं खरं तर चेंडू स्विंग होत होता. यावरून तो प्रेशरमध्ये खेळत असल्याचे दिसून आले. फलंदाजी क्रमही बदललेला दिसला. कधी तिलक वर्मा वरच्या क्रमांकावर, तर कधी ब्रेविस फलंदाजीसाठी येतो,' ही बाबही मनोज तिवारीने निदर्शनास आणून दिली. दुसरीकडे तिवारीचे हे विधान वीरेंद्र सेहवागला पटलेलं नाही. तिवारीने हे विधान करताना खूपच घाई केली असं मला वाटतंय. मुंबई इंडियन्सनं यापूर्वी पाच सामने गमावूनही जेतेपद पटकावलं आहे. हार्दिकला आणखी काही सामन्यांत संधी मिळायला हवी, असं सेहवाग म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे को देख लेंगे’ म्हणत काँग्रेसच्या बड्या नेत्याला दिली फोनवरून धमकी; VIDEO

Birthday Cake Blast Video: वाढदिवसाचा केक फटाक्यांसारखा हातातच फुटला, Video सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Live Update: दादा भुसे यांच्या हस्ते अमरावती मध्ये पार पडला शासकीय ध्वजारोहन सोहळा

War 2 Review: हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा 'वॉर २' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

Independence Day: एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यात मध्यरात्री तिरंगा फडकावला, मानवी थरातून सलामी|VIDEO

SCROLL FOR NEXT