Rohit Sharma Viral Video : रोहित शर्मा फिल्डिंग दरम्यान फॅनला पाहून दचकला, अन् मागे धावू लागला...

IPL 2024 : मुंबई राजस्थान या दोन्ही संघांमध्ये सोमवारी वानखेडे स्टेडियममध्ये सामना पार पडला. या सामन्यादरम्यान रोहितच्या चहात्याने चक्क सुरक्षा कठडे तोडत त्याला मिठी मारण्यासाठी मैदानावर धाव घेतली.
Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma Viral Videosaam digital

Mumbai Indians Vs Rajasthan Royals:

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमधील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सोमवारी पार पडला. सामना सुरु असताना इशान किशन आणि रोहित शर्मा दचकल्याची घटना समोर आली. सामना सुरु असताना रोहित शर्माचा एक फॅन मैदानात आला होता. मात्र हा फॅन अचानक समोर आल्याने रोहितही घाबरला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Sharma Viral Video
MI vs RR, IPL 2024: मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक ! परागच्या शानदार खेळीच्या बळावर रॉयल्सचा पलटणवर शानदार विजय

झालं असं की, मुंबईची फिल्डिंग सुरु असताना रोहित स्लिपमध्ये उभा होता. त्याचवेळी मागच्या बाजूने एक फॅन रोहित शर्माच्या दिशेने धावत आला. फॅन अचानक रोहितच्या जवळ आला अन् मोठ्याने काहीतरी बोलला. मात्र तो आवाज ऐकून रोहित काही क्षण थबकला. फॅनला पाहून रोहित काही पावलं मागे सरकल. काही क्षण थांबून फॅनने रोहितला मिठी मारली. यानंतर इशान त्या चाहत्याला काहीतरी बोलताना दिसला. मात्र, चाहत्याने त्यालाही मिठी मारली. दोघांना हस्तांदोलनही केले.

दोन्ही क्रिकेटपटूंना भेटल्यानंतर, फॅन आनंदात माघारी फिरला. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून स्टेडियमच्या बाहेर नेले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, या घटनेमुळे मैदानातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात मोठा बदल करण्यात आला. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याला जबाबदारी दिली. हीच बाब मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खटकली. सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबईला पराभव स्विकारावा लागला. हा या हंगामातील मुंबईच्या संघाचा तिसरा पराभव होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com