Cutest Video On Internet Today: 'मुंबई इंडियन्स'ला 'गुलाबी साडी' ची भुरळ, स्टेडियममध्येच केला धम्माल डान्स; VIDEO व्हायरल

Team Mumbai Indians Dance Video: 'मुंबई इंडियन्स'च्या खेळाडूंचा एक जबदस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. 'मुंबई इंडियन्स'च्या खेळाडूंनी 'गुलाबी साडी' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
Mumbai Indians Dance Video
Mumbai Indians Dance Video Saam Tv
Published On

Hardik Pandya And Ishan Kishan Dance Video:

आयपीएलच्या 17 व्या सीझनला (IPL Season 17) आजपासून सुरू होणार आहे. क्रिकेटप्रेमींसह संपूर्ण देशाचे आपयपीएलकडे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या या सीझनमध्ये सामना खेळण्यासाठी सगळ्या टीम सज्ज झाल्या आहेत. आयपीएल 2024 या (IPL 2024) स्पर्धेची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्याने होणार आहे. आज आयपीएल 2024 चा उद्घाटन सोहळा देखील पार पडणार आहे.

सध्या सोशल मीडियावर आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या टीमचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशामध्ये 'मुंबई इंडियन्स'च्या खेळाडूंचा एक जबदस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. 'मुंबई इंडियन्स'च्या खेळाडूंनी 'गुलाबी साडी' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

सध्या सोशल मीडियावर 'गुलाबी साडी' या मराठी सुपरहिट गाण्याने सर्वांना वेड लावले आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी यावर रील्स तयार केले आहेत. आता क्रिकेटपटूंनी देखील या गाण्यावर रील्स तयार करण्याची संधी सोडली नाही. आयपीएलमधील टीम 'मुंबई इंडियन्स'ने या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे. क्रिकेटच्या स्टेडियमवरच या टीममधील क्रिकेटर्सने डान्स केला आहे. त्यांच्या एक-एक फनी डान्स स्टेप पाहून तु्म्हाला सुद्धा हसायला येईल. त्याचा हा फनी डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली असून ते यावर कमेंट्स करत क्रिकेटर्सचे कौतुक करत आहेत.

'वहिनी Meets मुंबई इंडियन्स' असं या व्हिडीओवर लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीला करण सोनावणे हा डोक्यावर गुलाबी ओढणी घेऊन स्टेडियमवर एन्ट्री करताना दिसतोय. त्यानंतर तो इशान किशन करणला म्हणजे वहिनीला पाहून लाजतो. त्यानंतर पियूष चावला करणला पाहून सुंदर म्हणतो. त्यानंतर करण लाजत स्टेडिअमवर ठुमके देत चालताना दिसत आहे. त्यानंतर एकापोठापाठ इशान किशन, हार्दिक पांड्या, टिम डेविड आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी गुलाबी साडी या गाण्यावर करणसोबत जबरदस्त डान्स केला. त्यांच्या डान्स स्टेप खतरनाक आहेत. या गाण्यावर या सर्वांनी खूपच धम्माल केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'क्युटेस्ट व्हिडीओ ऑन द इंटरनेट टुडे', असे लिहिण्यात आले आहे.

Mumbai Indians Dance Video
IPL 2024 Opening Ceremony: आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी दाखवणार जलवा, अक्षय कुमारसह 'हे' कलाकार होणार सहभागी

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत या सर्वांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'बेस्ट कोलॅब केलंय. मुंबई इंडियन्सवाले सर्वच्या सर्व डान्सर आहेत.' 'गुलाबी साडी गाण्यावर डान्स करुन तुम्ही दिवस खास बनवला.' तर अनेकांनी, 'अति सुंदर वहिणी', 'एकदम गोंडस', 'हार्दिक पांड्या किल इट', 'करण खूपच छान', 'बेस्ट वर्जन गुलाबी साडी गाणं', अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे.

Mumbai Indians Dance Video
२ दिवस मी झोपलेच नाही..., शाहरुख खानसोबतचा व्हिडीओ शेअर करत Preity Zintaने सांगितला किस्सा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com