आयपीएलच्या 17 व्या सत्रात मुंबई इंडियन्सचा संघ संघर्ष करताना दिसतोय. पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्यापही विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या दोन सामन्यामधील पराभवानंतर मुंबईचा संघ त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर पुढील चार मॅच खेळणार आहे. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या संघाचा इतर खेळाडूंसोबत एका मुलीचे फोटो व्हायरल झाले होते. ती मुलगी कोण आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. रोहित शर्मा, बुमराह, पंड्यासोबत आणि इतर खेळाडूंसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता.
मुंबई इंडियन्स संघासोबत व्हायरल झालेल्या फोटोमधल्या तरुणीचं नाव सेजल जयस्वाल आहे. ती एक प्रोफेशनल मॉडल आहे. सेजलनं तीच्या मॉडलिंग कारियरची सुरुवात तिच्या वयाच्या १९ व्या वर्षी केली. सेजलने 'दिल मांगे मोअर' आणि 'डेडींग इन डार्क' या प्रसिद्ध मालिकांमधून मोठ्या परद्यावर झळकली आहे. व्हायरल फोटोमध्ये सेजल मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंसोबत फ्लाइटमध्ये एकदम खुश दिसत आहे. सेजल मुंबई इंडियन्सची खुप मोठी चाहती असल्याचं कळतयं. ती तीच्या सोशल मिडियावर खेळाडूंसोबतचे फोटो आणि रिल्स शेअर करत असते.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई संघाच्या पुढील चार सामने वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.त्यांची आयपीएल २०२४ ची सुरुवात जरी निराशाजनक ठरली असली तरी त्याच्या पुढील सामने संघाच्या होम ग्राउंडवर होणार आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर हैदराबाद संघाने मुंबईचा 31 धावांनी पराभव केला.
आयपीएल २०२४ मध्ये एक ट्रेंड पाहायला मिळतोय. आतापर्यंत ज्या संघाचा होम ग्राऊंडवर सामना झालेला आहे, त्या संघाने विजय मिळवला आहे. आता मुंबईचा पुढील सामना राजस्थान विरुद्ध 1 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात तरी मुंबईला विजय मिळवता येणार का याची क्रिकेटप्रेमींना आतुरता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.