India vs New Zealand 1st T20 Playing 11 saam tv
Sports

Ind Vs Nz: पहिल्या टी-२० साठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११; या खेळाडूंना मिळणार संधी

India vs New Zealand 1st T20 Playing 11: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० सिरीजमधील पहिला सामना २१ जानेवारी रोजी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वनडे सिरीजनंतर आजपासून भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सिरीजला सुरुवात होणार आहे. वनडे सिरीजमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया टी-२० मध्ये कमबॅक करणार का हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पहिला सामना २१ जानेवारी रोजी खेळला जाणार असून सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते ते पाहूयात.

कोण करणार ओपनिंग?

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपनिंगला उतरणार आहेत. गेल्या सिरीजमध्ये गिलने अभिषेकसोबत डावाची सुरुवात केली होती. मात्र त्याचा खेळ पाहता त्याला टीममधून वगळण्यात आलं. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार इशान किशन उतरू शकतो. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार फलंदाजीसाठी उतरणार आहे.

तर पाचव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या मैदानात उतरणार आहे. हार्दिक सध्या केवळ एकाच फॉरमॅटमध्ये खेळतोय. यानंतर, अक्षर पटेल किंवा रिंकू सिंग यांना संधी दिली जाऊ शकते. या दोन्ही खेळाडूंसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

दुसरीकडे शिवम दुबेला देखील प्लेईंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात हर्षित राणाची फलंदाजी पाहता त्यालाही संधी मिळू शकते. राणा गोलंदाजीमध्ये पूर्ण ४ ओव्हर्स टाकतो. अशावेळी गरज पडल्यास रन्स देखील काढू शकतो. या दोघांपैकी कोण खेळेल हे ठरवणं कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी कठीण निर्णय असू शकतो.

वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांची जागा निश्चित आहे. तर वरुण चक्रवर्ती एक उच्च स्पिनर गोलंदाज म्हणून खेळू शकते. अशा परिस्थितीत कुलदीप यादवला या सामन्यातून बाहेर बसावं लागू शकतं. अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार आहे आणि तो टीमचा भाग असेल यात काही शंका नाही.

पहिल्या सामन्यासाठी कशी असेल टीम इंडिया?

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावर आज सुनावणी झालीच नाही

Skin Care : तुमची त्वचा ड्राय होते? मग ट्राय करा 'या' नॅचरल फेशियल टिप्स

Saree Matching Blouse Designs: साडीवर मॅचिंग ब्लाऊज कसा निवडायचा? हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Banarasi Saree Blouse Designs : बनारसी साडीवर शिवा 'या' ट्रेंडी डिझाइनचे ब्लाउज, पारंपरिक लूकला मिळेल मॉडर्न ट्विस्ट

Metabolic Syndrome: मेटाबोलिक सिंड्रोम म्‍हणजे काय? शरीरातील थायरॉईड कसा ठेवाल उत्तम? निरोगी शरीरासाठी काय घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT