ipl trophy saam tv news
क्रीडा

IPL 2024: आयपीएल ट्रेड आणि स्वॅप म्हणजे काय? वाचा शेवटची तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

IPL Trade And Swap Meaning: तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की,ट्रेड आणि स्वॅप ही नेमकी भानगड तरी काय? जाणून घ्या शेवटची तारीख अन् संपूर्ण प्रक्रिया

Ankush Dhavre

IPL 2024 Swap And Trade Process:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा समारोप झाला आहे. आता आयपीएल स्पर्धेच्या चर्चा रंगायल्या सुरुवात झाली आहे. आगामी आयपीएल स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा १९ नोव्हेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. या लिलाव सोहळ्यापूर्वी फ्रँचायजी खेळाडूंना ट्रेड आणि स्वॅप करताना दिसून येत आहे.तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की,ट्रेड आणि स्वॅप ही नेमकी भानगड तरी काय? जाणून घ्या.

आयपीएल ट्रेड म्हणजे काय?

आयपीएल ट्रेडनुसार, कुठलीही फ्रँचायजी आपापसात खेळाडूंची ट्रेडिंग करु शकतात.यानुसार फ्रँचायजी कुठल्याही २ खेळाडूंना खरेदी आणि विक्री करु शकतात. हा करार २ संघांमध्ये केला जातो. हा ट्रेड करण्यासाठी फ्रँचायजींना आयपीएल गव्हर्नर्स कौन्सिलची अनुमती घ्यावी लागते. तसेच ज्या खेळाडूचा ट्रेड केला जाणार आहे त्या खेळाडूचीही अनुमती घेणं गरजेचं आहे.

एखाद्या खेळाडूची मागणी जास्त असेल आणि सर्व फ्रँचायजी त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक असतील. तर त्याला कुठल्या संघासोबत ट्रेड करायचं हे त्या संघावर आणि त्या खेळाडूवर अवलंबून असेल. मुख्य बाब म्हणजे फ्रँजायजी आपल्या आयकॉन खेळाडूचा ट्रेड करु शकत नाही.

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावासाठी फ्रँजायजींना लवकरात लवकर रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे. ही यादी पाठवण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर आहे. ट्रेडिंग विंडो अजून खुली आहे. लिलावाच्या ७ दिवस आधीपर्यंत ही विंडो खुली राहणार आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी लिलाव पार पडणार आहे. ट्रेड केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी समोर आल्यानंतर कुठल्या फ्रँयायजीकडे किती रक्कम शिल्लक आहे, हे कळेल. (Latest sports updates)

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी आतापर्यंत ट्रेड करण्यात आलेले खेळाडू..

रोमारियो शेफर्ड (५० लाख) - लखनऊ सुपर जायंट्समधून मुंबई इंडियन्स संघात

देवदत्त पडिक्कल (७.५ कोटी)- राजस्थान रॉयल्समधून लखनऊ सुपर जायंट्स संघात

आवेश खान ( १० कोटी) - लखनऊ सुपर जायंट्समधून राजस्थान रॉयल्स संघात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: ऑस्ट्रेलियाचा सर्वात खतरनाक गोलंदाज RCB च्या ताफ्यात

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Devendra Fadanvis News : राज्याच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, देवेंद्र फडणवीसांचं जनतेसाठी खास पत्र

Maharashtra Politics : नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

SCROLL FOR NEXT