IND vs ENG T20 World Cup 2026 Semi Final saam tv
Sports

IND vs ENG Semi Final: ...तर एकही चेंडू न खेळता टीम इंडियाचं वर्ल्डकपमधील आव्हान संपणार; वाचा काय आहे तो ICC चा नियम?

IND vs ENG T20 World Cup 2026 Semi Final: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पाऊस पडल्यास काय होणार? रिझर्व्ह डे नियम काय आहेत आणि सामना रद्द झाल्यास कोणती टीम फायनलमध्ये पोहोचेल हे जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

आज टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. जर या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर भारत सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.

मात्र या सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न म्हणजे आजच्या सेमीफायनलमध्ये पाऊस पडला तर? जर आजच्या सामन्यात पाऊस पडला तर सेमीफायनलचं तिकीट कोणत्या टीमला मिळणार हे पाहावं लागणार आहे.

सेमीफायनलसाठी खास रिझर्व्ह डे

टी-२० वर्ल्डकपच्या नॉक आऊट सामन्यांसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायलनचा समावेश आहे. जर गुरुवारी पाऊस पडला तर सामना सुरू होऊ शकत नाही. अशावेळी सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

जर सामना आज म्हणजेच ५ मार्च रोजी सुरू झाला आणि सामना सुरु असताना पाऊस आला आणि सामना पुन्हा सुरू करता आला नाही तर दुसऱ्या दिवशी सामना जिथे सामना थांबवला होता तिथून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

जर रिझर्व्ह डे लाही पाऊस पडला तर

दुसरा प्रश्न असा आहे की, जर दोन्ही दिवशी पाऊस पडला आणि एकही बॉल टाकला नाही तर तर कोणत्या टीमला फायनलचं तिकीच मिळू शकतं? या परिस्थितीत सुपर ८ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टीमला अंतिम फेरीत गाठण्याची संधी मिळणार आहे.

सोप्या भाषेत सांगायचं तर जर दोन्ही दिवशी पाऊस पडला तर इंग्लंड फायनलसाठी पात्र ठरणार आहे. इंग्लंडने सुपर ८ चे तिन्ही सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ही टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होती.

दुसरीकडे टीम इंडियाने सुपर ८ मध्ये तीनपैकी दोन सामने जिंकले होते. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जर सामना रद्द झाला तर टीम इंडियाची अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅबिनेटमध्ये होणार फेरबदल; मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार, या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Sunday Horoscope: आर्थिक लाभ होणार, सुर्याच्या कृपेने 5 राशींचे आयुष्य भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sachin Tendulkar: हेल्मेट कुठे आहे? पुण्याच्या रस्त्यावर अचानक सचिन प्रकटला, नेमकं काय घडलं? VIDEO

Chanakya Niti: चांगल्या वेळेत साथ अन् वाईट काळात दुरावा, या ५ हंसाच्या स्वभावासारख्या व्यक्तींपासून राहा लांब

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात पावसाच्या सरींनी नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT