ind vs aus twitter
Sports

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकले किंवा हरले तर कसं असेल गणित? समजून घ्या संपूर्ण गणित सोप्या शब्दात

Team India WTC Final Scenario: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र आता गणित किचकट झालं आहे. इथून पुढे कसं असेल समीकरण? जाणून घ्या .

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. ५ कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने २९५ धावांनी विजय मिळवला होता.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली. त्यानंतर झालेला तिसरा कसोटी सामना ड्रॉ राहिला. मालिकेतील चौथा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाणार की नाही, ते चौथ्या आणि पाचव्या सामन्याच्या निकालावरुन कळेल. दरम्यान कसं आहे भारतीय संघासाठी फायनलमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ कितव्या स्थानी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ राहिला होता. या ड्रॉ मुळे भारतीय संघाची विजयाची सरासरी ५७.२९ वरुन ५५.८८ वर जाऊन सरकली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत स्थितीत आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची सरासरी ६३.३३ तर ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ५८.८९ इतकी आहे.

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. हा कसोटी सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ आणखी मजबूत स्थितीत पोहचू शकतो. तर ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाविरुद्धचे २ सामने झाल्यानंतर श्रीालंकेविरुद्ध आणखी २ सामने खेळायचे आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत.

भारतीय संघासाठी कसं असेल समीकरण?

जर भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामना गमावला आणि सिडनी कसोटी सामना जिंकला

जर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त झाली, तर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५५.२६ इतकी राहिल. असं झाल्यास ऑस्ट्रेलियाने जर श्रीलंकेविरुद्ध होणारे दोन्ही सामने ड्रॉ केले, तरीदेखील ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

जर भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामना गमावला आणि पुढील कसोटी सामना ड्रॉ झाला तर...

भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावली, तर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५१.७६ इतकी असेल. असं झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ सरळ फायनलमध्ये प्रवेश करेल. तर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

जर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली तर...

जर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली कसोटी मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली, तर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५३.५० वर जाऊन पोहचेल. असं झाल्यास, ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध खेळताना कमीत कमी १ सामना जिंकावा लागेल. असं झाल्यास श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT