
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा थरार मेलबर्नमध्ये सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी चांगलीच जमली. मात्र यशस्वी जयस्वालला रनआऊट होऊन माघारी परतावं लागलं.
यशस्वी जयस्वालचा रनआऊट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. यशस्वी जयस्वाल बाद होण्यात नेमकी चूक कोणाची? यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. काहींच्या मते चूक विराट कोहलीची होती, तर काहींच्या मते जयस्वाल स्वत:च्या चुकीमुळे बाद झाला असं म्हटलं जात आहे. आता ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने या रनआऊटवर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर स्टीव्ह स्मिथने पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. या पत्रकार परिषदेत बोलताना नितीश कुमार रेड्डी म्हणाला, ' तेव्हा असं वाटलं, जयस्वाल हो म्हणाला आणि धावला. मात्र विराटने त्याला माघारी जायला सांगितलं. इतकी छोटी गोष्ट आहे. मला याहून जास्त काहीच माहित नाही. मी इतकंच ऐकलं होतं.'
तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४७४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालने शतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करुन दिलं. दोघांनी १०२ धावांची भागीदारी केली.
दरम्यान ४१ व्या षटकात यशस्वी जयस्वालने मिड- ऑनच्या दिशेने शॉट मारला. शॉट मारताच तो धावला. धावता धावता तो नॉन स्ट्राईकजवळ पोहोचला. मात्र नॉन स्ट्राईकला असलेल्या विराटने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. विराटने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं, त्यावेळी त्याला माघारी जायला सांगितलं. इतक्यात तो धावबाद झाला. जयस्वालला शतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या १८ धावा करायच्या होत्या. मात्र तो ८२ धावांवर माघारी परतला.
यशस्वी जयस्वालच्या रनआऊटची जोरदार चर्चा सुरु आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि संजय मांजरेकर यांच्यातही जयस्वालच्या रनआऊटवरुन जोरदार चर्चा रंगली. संजय मांजरेकरांच्या मते चूक विराट कोहलीची होती. तर इरफान पठाणच्या मते,चूक यशस्वी जयस्वालची होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.