marlon-samuels google
Sports

Marlon Samuels: वेस्टइंडिजला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूवर ICC ची कारवाई; घातली ६ वर्षांची बंदी, काय आहे प्रकरण?

Ban On Marlon Samuels: वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज मार्लन सॅम्युअल्सवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घ्या.

Ankush Dhavre

ICC Ban On Marlon Samuels:

वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज मार्लन सॅम्युअल्सवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. वेस्टइंडिजला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या या खेळाडूवर आयसीसीने ६ वर्षांचा बॅन लावला आहे.

आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर तो देशातंर्गत क्रिकेटमध्ये होणाऱ्या लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येत असतो. मात्र भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात दोषी आढळून आल्यानंतर त्याच्यावर आयसीसीने ६ वर्षांची बंदी घातली आहे.

मार्लन सॅम्युअल्सने अमिरात क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी संबधित असलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आयसीसीचे एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्श यांनी मार्लन सॅम्युअल्सवर बंदीची घोषणा केली आहे.

त्यांनी असं म्हटलं आहे की,' सॅम्युअल्स गेल्या २ दशकांपासून क्रिकेट खेळतोय. यादरम्यान त्याने अनेकदा भ्रष्टाचारविरोधी सेशनमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्याला माहीत असेल की, त्याची काय जबाबदारी आहे. तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. ज्यावेळी त्याने हा गुन्हा केला त्यावेळी तो संघाचा भाग होता.'

नेमकं काय घडलं?

मार्लन सॅम्युअल्स असा आरोप आहे की, अबु धाबी टी-१० लीग २०१९ स्पर्धेदरम्यान त्याने भ्रष्टाचाराशी संबधित नियमांचे उल्लंघन केलं होतं.त्यामुळे त्याच्यावर कलम २.४.२, कलम २.४.३, कलम २.४.६,कलम २.४.७ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्लन सॅम्युअल्सने २०१२ आणि २०१६ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये वेस्टइंडिजसाठी सर्वाधिक खेळी केली होती. २०१८ मध्ये तो वेस्टइंडिजसाठी आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला. (Latest sports updates)

मार्लन सॅम्युअल्सच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तर वेस्टइंडिजसाठी त्याला ७१ कसोटी, २०७ वनडे आणि ६७ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT