West Indies x
Sports

Cricket : ११ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप; स्टार क्रिकेटपटू अडचणीत, प्रकरणावर बोर्डाची प्रतिक्रिया समोर

West Indies च्या क्रिकेटपटूवर ११ महिलांवर बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या माहितीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर वेस्ट इंडिजच्या क्रिकेट बोर्डाने प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

वेस्ट इंडिजचा कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यादरम्यान एका बातमीने मोठी खळबळ उडाली आहे. वेस्ट इंडिजच्या एका क्रिकेटपटूवर ११ महिलांवर बलात्कार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. वेस्ट इंडियन क्रिकेट बोर्डाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आरोप झालेल्या क्रिकेटपटूचे नाव अद्याप उघड झालेले नसले तरी, तो सध्याच्या संघाचा भाग आहे अशी माहिती समोर आली आहे.

स्पोर्ट्स मॅक्स चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडियन क्रिकेट संघाचा भाग असलेल्या गुयानाच्या स्थानिक खेळाडूवर झालेल्या आरोपांबद्दल वेस्ट इंडियन बोर्डाला प्रश्न विचारण्यात आले. बोर्डाला या प्रकरणाची माहिती आहे का? जर माहिती असेल, तर बोर्डाने कोणती कारवाई केली? असे काही प्रश्न विचारण्यात आले होते. वेस्ट इंडियन बोर्डाचे अध्यक्ष किशोर शॅलो यांनी विचारलेल्या प्रश्नांवर 'सध्या बोर्डाकडे या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती नाही, त्यामुळे मी यावर भाष्य करु शकत नाही', असे उत्तर दिले.

गुयानामधील स्थानिक वृत्तपत्र कैतेऊर स्पोर्ट्सने सर्वप्रथम ही धक्कादायक बातमी प्रकाशित झाली होती. वेस्ट इंडिज संघातील खेळाडूवर ११ महिलांनी बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. या बातमीला गुयानामधील वृत्तपत्राने मॉन्स्टर इन मरून असे नाव दिले होते.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सध्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना सध्या सुरु आहे. हा सामना बार्बाडोसमध्ये रंगला आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ विकेट गमावल्यानंतर ९२ धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ १९० धावांवर ऑलआउट झाला होता. त्यांनी फक्त १० धावांची आघाडी घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar: विधानभवनात हाणामारी करणारा पडळकर समर्थक ऋषिकेश टकलेची वाजतगाजत मिरवणूक|VIDEO

Moong Dal Halwa Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली तर, झटपट बनवा खमंग मूग डाळ हलवा

Hair Fall: केस गळताहेत? तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या

Air India Plane Fire: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात; लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाला आग

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे नापणे धबधब्यावर लोकार्पण

SCROLL FOR NEXT