team india saam tv
Sports

IND vs WI: कसोटी मालिकेपूर्वी ट्रेनिंग कॅम्पसाठी संघाची घोषणा! पाहा संपूर्ण वेळापत्रक

West Indies Squad: भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे.

Ankush Dhavre

West Indies Squad For IND VS WI Series: भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघामध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजने सराव शिबिरासाठी संघाची घोषणा केली आहे. क्रेग ब्रेथवेटकडे या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. सध्या वेस्ट इंडीजचा संघ वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामने खेळण्यात व्यस्त आहे.

वेस्ट इंडिजचा संघ सध्या झिम्बाब्वेमध्ये वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामने खेळताना दिसून येत आहे. पात्रता फेरीत सुपर - ६ फेरीतील अंतिम सामना ७ जुलै रोजी रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना ९ जुलै रोजी रंगणार आहे.

या स्पर्धेत जेसन होल्डर, निकोलस पुरन, काईल मेयर्स, रोस्टन चेज आणि अल्झारी जोसेफ हे खेळाडू वेस्ट इंडिज संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येत आहेत. हे खेळाडू भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत खेळताना दिसून येणार आहेत. मात्र सराव शिबिरासाठी उपलब्ध नसतील. (West Indies Squad)

१८ खेळाडूंची केली निवड...

या सराव शिबिरासाठी वेस्ट इंडिजच्या १८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर शुक्रवारपासून सराव शिबिराला सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी ९ जुलै रोजी वेस्ट इंडिजचा संघ डॉमिनिकाला रवाना होणार आहे.

भारतीय संघातील खेळाडू बार्बाडोस येथे सराव शिबिराला सुरुवात करणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. (Latest sports updates)

असे आहे संपुर्ण वेळापत्रक..

कसोटी मालिका.

पहिला कसोटी सामना- १२ ते १६ जुलै, विंडसर पार्क

दूसरा कसोटी सामना - २० ते २४ जुलै, क्विंस पार्क ओव्हल, त्रिनिदाद

वनडे मालिका

पहिला वनडे सामना- २७ जुलै, केन्सिंगटन ओव्हल, बारबडोस

दूसरावनडे- 29 जुलाई, केन्सिंगटन ओवल, बारबडोस

तिसरा वनडे सामना- १ ऑगस्ट, ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

टी-२० मालिका

पहिला टी-२० सामना- ३ ऑगस्ट, ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

दूसरा टी-२० सामना- ६ ऑगस्ट, नॅशनल स्टेडियम, गयाना

तिसरा टी-२० सामना- ८ ऑगस्ट, नॅशनल स्टेडियम, गयाना

चौथा टी-२० सामना- १२ ऑगस्ट, ब्रोवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल फ्लोरिडा

पाचवा टी-२० सामना- १३ ऑगस्ट, ब्रोवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल फ्लोरिडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT