How To Book ICC World Cup 2023 Tickets: आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरु व्हायला अवघे १०० दिवस शिल्लक राहिले आहेत. मंगळवारी(२७ जून) एका भव्य कार्यक्रमात आयसीसी आणि बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
तब्बल १२ वर्षानंतर भारताला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्व न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच क्रिकेट चाहत्यांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की, या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठीचं तिकीट कसं बुक करायचं? तर सोप्या शब्दात समजून घ्या.
वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी तिकीट कसं बुक करायचं?
आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे. या स्पर्धेतील सामने हैदराबाद, धर्मशाळा, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद या ठिकाणी रंगणार आहेत.
हे सामने पाहण्यासाठी तुम्ही तिकीट ऑनलाईन बुक करू शकता. हे तिकीट तुम्ही आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा आयसीसीच्या अॅपवरून बुक करू शकता. तसेच हे तिकीट तुम्ही Pyatm, Paytm Insider आणि Book My Show अॅपवरून देखील बुक करू शकता.
तिकिटांची किंमत किती?
माध्यमातील वृत्तानुसार, आयसीसी वर्ल्ड कपचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त १० हजार रुपये खर्च येऊ शकतो. हे दर प्रत्येक स्टेडियमनुसार वेगवेगळे असू शकतात. (Latest sports updates)
असे आहेत भारतीय संघाचे सामने..
८ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
१५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
१९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
५ नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
११ नोव्हेंबर - भारत विरुद्ध क्वालिफायर, बंगळुरू (ICC ODI WC 2023 Time Table)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.