Rishabh Pant Admits His Mistake saam tv
Sports

DC vs LSG: ...तर आम्ही जिंकलो असतो! निसटत्या पराभवानंतर पंतने स्वतःची चूक मान्य केली; म्हणाला, नशीबाने मोठी...!

Rishabh Pant admits mistake after loss: लखनऊच्या संघाला अवघ्या १ विकेटने पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात लखनऊच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी कर्णधार ऋषभ पंतकडून अपेक्षित खेळी पाहायला मिळाली नाही. विशेषतः निर्णायक क्षणी पंतकडून झालेल्या मोठ्या चुकांमुळे संघाला हा पराभव स्वीकारावा लागला.

Surabhi Jayashree Jagdish

सोमवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत प्रथम फलंदाजी करताना अपयशी ठरला आणि त्यानंतर त्याला सामनाही गमवावा लागला. या सामन्यात लखनऊच्या टीमला १ विकेटने सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान लखनऊच्या गोलंदाजांना कर्णधार ऋषभ पंतकडून ज्या खेळीची अपेक्षा होती त्यामध्ये देखील तो अपयशी ठरला. या सामन्यात पंतकडून एक मोठी चूक झाली ज्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पराभवानंतर काय म्हणाला पंत?

पराभवानंतर पंत म्हणाला की, मला वाटतं आमच्याकडून अजून काही रन्स पाहिजे होते. फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. मधल्या काळात कदाचित आम्ही लस गमावली असावी. स्टब्स, आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांच्यात दोन चांगल्या पार्टनरशिप झाल्या.

तो पुढे म्हणाला की, मला असं वाटतंय की, चेंडू जसजसा जुना झाला, तसतशी गोलंदाजांना मदत मिळत गेली. पण, आम्ही मुळातच काही महत्त्वाच्या गोष्टींवर अधिक लक्ष देऊ शकत होतो. आमच्यावर कामगिरीसाठी दबाव होता. ही तर स्पर्धेची सुरुवात आहे आणि आम्ही मजल दरमजल पुढे जात आहोत. या सामन्यात खरं सांगायचं तर नशिबाने मोठी भूमिका बजावली. जर बॉल त्याच्या पॅडवर लागला नसता, तर तो स्टंपिंगची एक उत्तम संधी असती."

पंतने केली ही मोठी चूक

दिल्लीला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल्समध्ये 6 रन्सची आवश्यकता होती. तर लखनऊला सामना जिंकण्यासाठी फक्त एका विकेटची आवश्यकता होती. २० व्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर शाहबाज अहमदने ती संधी निर्माण केली, पण विकेटमागे उभा असलेला कर्णधार पंत बॉल योग्यरित्या पकडू शकला नाही आणि स्टंपिंगची संधी हुकली.

दरम्यान रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आलं की, बॉल पहिल्यांदा मोहितच्या पॅडवर लागला, ज्यामुळे बॉलने दिशा बदलली. ज्याचा उल्लेख पंतने सामना संपल्यानंतर केला आणि म्हटलं की, जर चेंडू मोहित शर्माच्या पॅडवर लागला नसता तर स्टंपिंगची मोठी शक्यता होती. यावेळी पंतने त्याची चूक देखील मान्य केली आहे.

दिल्लीचा पहिला विजय

दिल्लीच्या टीमने लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचा एका विकेटने पराभव केला. अगदी अटीतटीच्या या सामन्यात दिल्लीच्या टीमने अखेर बाजी मारली. 210 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या दीड ओव्हरमध्येच दिल्लीची अवस्था 7 रन्सवर 3 बाद अशी होती. मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत दिल्लीला विजयाच्या वाटेवर नेलं. दरम्यान माझ्या नेतृत्वाखाली टीम अशीच कामगिरी करताना दिसेल असं दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने सामन्यानंतर म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT