DC vs LSG IPL 2025: 'इम्पॅट' प्लेअर ठरला 'हिरो'; आशुतोष शर्मानं धमाकेदार फलंदाजी करत लखनौला नमवलं

DC vs LSG Live स्कोअर, IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सीझनचा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला.
DC vs LSG IPL 2025: 'इम्पॅट' प्लेअर ठरला 'हिरो'; आशुतोष शर्मानं धमाकेदार फलंदाजी करत लखनौला नमवलं
Published On

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला गेला. विशाखापट्टणम येथे हा रोमांचकारी सामना खेळला गेला. आयपीएलमधील चौथा सामना हा फुल मनोरंजक ठरला. विजय कोणत्या संघाच्या पारड्यात जाणार हे कळत नव्हतं. शेवटी आशुतोषने विजयी षटकार मारत दिल्ली जिंकून दिलं. त्याने ६६ धावा करत आशुतोष हा दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. हृदयाची धकधक वाढवणारा हा सामना विशाखापट्टणमचे डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.

आयपीएल 2025 मधील आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखौनाच्या संघाने 210 धावांचे लक्ष्य दिले होतं.

210 धावांचं आव्हान करताना दिल्लीच्या संघाची काहीशी पडझड झाली. मात्र इम्पॅट प्लेअर म्हणून दिल्लीच्या संघात आलेल्या आशुतोषनं धमाकेदार खेळ केला. आशुतोष शर्माच्या बळावर दमदार पुनरागमन करत अखेरच्या षटकात अवघ्या 1 गडी राखून सामना जिंकला.

DC vs LSG IPL 2025: 'इम्पॅट' प्लेअर ठरला 'हिरो'; आशुतोष शर्मानं धमाकेदार फलंदाजी करत लखनौला नमवलं
DC vs LSG, IPL 2025: मार्श - पुरनची तुफान फटकेबाजी! दिल्लीसमोर जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंत लखनौचा कर्णधार आहे. पंतने याआधी 5 सामन्यात दिल्ली संघाचे नेतृत्व केले. लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार म्हणून हा त्याचा पहिला सामना होता. तर अक्षर पटेलही दिल्लीकडून पहिल्यांदा कर्णधारपदाची जबाबदारी निभावत होता. पहिल्या सामन्यात अक्षरने आपल्या नेतृत्त्वाची कमाल दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com