Wanindu Hasaranga Retired From Test Cricket: येत्या काही दिवसात आशिया चषक आणि वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. २६ वर्षीय खेळाडू वनिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिर्घकाळ मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळता यावं म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. या स्टार खेळाडूला श्रीलंकेसाठी ४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १९६ धावा करत ४ गडी देखील बाद केले आहेत.
वनिंदू हसरंगाने २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर २०२१ मध्ये बांगलादेश संघाविरूद्ध तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
माध्यमातील वृ्त्तानुसार वनिंदू हसरंगाने पत्र लिहून श्रीलंका क्रिकेट बोर्डला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची कल्पना दिली होती. हा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेट बोर्डने स्वीकार केला आहे. तसेच त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. (Latest sports updates)
फॉर्ममध्ये असून केली निवृत्तीची घोषणा..
वनिंदू हसरंगा नुकताच सुरू असलेल्या लंका प्रिमियर लीग स्पर्धेत बी लव कँडी संघाचे प्रतिनिधीत्व करतोय. या स्पर्धेत तो आतापर्यंत तिसरा सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ११ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने २१२ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे.
तर बी लव कँडी हा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. वनिंदू हसरंगाच्या नेतृ्त्वाखाली खेळताना या संघाने ८ पैकी ४ सामने जिंकले आहेत.तर ४ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाने स्पर्धेतील सुरूवातीच्या ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.तर पुढील सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.