Virendra Sehwag Vaibhav Suryavanshi X
Sports

...तो IPL च्या पुढच्या पर्वात दिसणार नाही, वीरेंद्र सेहवाग वैभव सूर्यवंशीबद्दल असं का म्हणाला?

Virendra Sehwag IPL 2025 : वीरेंद्र सेहवाग सध्या आयपीएल २०२५ मध्ये कॉमेंट्री करण्यात व्यस्त आहे. त्याने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला दिलेल्या सल्ल्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहेत.

Yash Shirke

Virendra Sehwag : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात संजू सॅमसनच्या जागी १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी देण्यात आली. वैभवने १२ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या. या सामन्यादरम्यान वीरेद्र सेहवागने वैभव सूर्यवंशीला अनोखा सल्ला दिला. सेहवागने केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

क्रिकबझशी संवाद साधताना वीरेंद्र सहवागने वैभव सूर्यंवशीला खेळावरील एकाग्रता गमावू नकोस, नेहमी विनम्र रहा असा सल्ला दिला. 'चांगली कामगिरी केल्याने तुमचे कौतुक होईल आणि खराब खेळीने तुमच्यावर टीका होईल हे तुम्हाला कळते. तेव्हा तुम्ही नम्र राहायला शिकता. मी असे अनेक खेळाडू पाहिले आहेत, जे आले, एक किंवा दोन सामन्यांमध्ये त्यांनी प्रसिद्धी मिळवली, पण त्यानंतर त्यांनी काहीही केलं नाही. आपण स्टार बनलो असे त्यांना वाटले', असे सेहवाग म्हणाला.

'सूर्यवंशीने आयपीएलमध्ये २० वर्षे खेळण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. विराट कोहलीकडे पाहा, विराट जेव्हा १९ वर्षांचा होता, तेव्हा त्याने खेळायला सुरुवात केली होती. तो आयपीएलच्या सर्व सीझनमध्ये खेळळा आहे. वैभवने विराटचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो जर याच सीझनमध्ये खुश असेल, मी आता करोडपती आहे, मी उत्तम पदार्पण केले आहे, पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे असे जर वैभवला वाटत असेल, तर तो आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये खेळताना दिसणार नाही', असे वक्तव्य वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे.

लखनऊ विरुद्ध राजस्थान या सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आयपीएलमध्ये दमदार एन्ट्री केली. लखनऊ विरुद्ध खेळताना त्याने २० चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन मोठ्या षटकारांचा समावेश होता. कालच्या बंगळुरू विरुद्धच्या सामन्यातही त्याने चांगली सुरुवात केली होती. पण अनुभवी भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT