Virendra Sehwag Video : चेन्नई सुपर किंग्सला काल आयपीएल २०२५ मधल्या पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. केकेआरने सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानात म्हणजेच चेपॉक स्टेडियममध्ये पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईने २० ओव्हर्समध्ये फक्त १०३ धावा केल्या. १०.१ ओव्हरमध्ये कोलकाताने हे लक्ष गाठले. परिणामनी कालचा सामना लवकर संपला.
ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असल्याने महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. कालच्या सामन्यात एमएस धोनी फक्त १ धाव करुन माघारी परतला. सोळाव्या ओव्हरमध्ये सुनील नारायण गोलंदाजी करत होता. तेव्हा तिसऱ्या बॉलवर महेंद्रसिंह धोनी एलबीडब्लू आउट झाल्याची घोषणा अंपायर्संनी केली. लगेच धोनीने डीआरएस घेतला. थर्ड अंपायर्सनी बॉल बॅटला लागला नाही असे म्हटले. बॉल ट्रॅकिंगमध्ये बॉल स्टंपला लागल्याने धोनीला आउट देण्यात आले.
सामना संपल्यानंतर वीरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा आणि जतिन सप्रू सामन्याविषयी चर्चा करत होते. तेव्हा जतिन सप्रू म्हणाला, जर महेंद्रसिंह धोनी आउट नसते तर सामन्याच्या निकालावर परिणाम झाला असता का? त्यावर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, मला असे वाटत नाही. जर धोनी बाद झाला नसता तर जास्तीत जास्त १३० धावा झाल्या असत्या.
'आता कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने किती ओव्हर्समध्ये लक्ष गाठले? १०.१ ओव्हर्स, जर धोनी आउट नसता तर आपण रात्री ११.३० वाजता लाईव्ह आलो असतो. इतकाच फरक असता', असे म्हणत वीरेंद्र सेहवागने महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला टोमणा मारला. वीरेंद्र सेहवागचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.