रविवारी आयपीएलमध्ये दोन सामने खेळवण्यात आले. यामध्ये पहिला सामना पंजाब किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यामध्ये खेळण्यात आला. या सामन्यात बंगळूरूने ७ विकेट्सने पंजाबचा पराभव केला. विराट कोहलीने यावेळी ५४ बॉल्समध्ये ७३ रन्सची खेळी केली. दरम्यान विजयानंतर विराट कोहलीने एक असं कृत्य केलं ज्यामुळे पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर चांगलाच संतापला होता.
सामना जिंकल्यानंतर कोहलीने श्रेयस अय्यरला चिवडत आक्रामक पद्धतीने सेलिब्रेशन केलं. या कृत्यावेळी विराट जाणूनबुजून श्रेयसला उकसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. १९ व्या ओव्हरमध्ये जितेश शर्माच्या पाचव्या बॉलवर सिक्स लगावत विराटने सामना जिंकला. मात्र यानंतर लगेच त्याने श्रेयस अय्यरकडे पाहून त्याचा चिडवत सेलिब्रेशन केलं. यानंतर विराट श्रेयसकडे जाऊन काहीतरी बोलू लागला. यावेळी श्रेयस विराटच्या कृत्यावर नाराज असल्याचं दिसून आलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधये विराट कोहलीशी बोलताना श्रेयसच्या रिएक्शनवरून तो नाखूश असल्याचं दिसून आलं. नाराज श्रेयसच्या चेहऱ्यावरील भाव कॅमेरात देखील कैद झाले आहेत. इतकंच नाही तर विराट कोहली देखील या कृत्यानंतर अय्यरला स्पष्टीकरण देताना दिसला.
पंजाब किंग्जची फलंदाजी सुरु असताना विराटने नेहल वढेराला रनआऊट केल्यानंतरही आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं. यावेळी विराटने पंजाबचा गोलंदाज हरप्रीत बराडसोबत देखील चर्चा केली.
कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा यांच्या गोलंदाजीनंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या तुफान खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा विजय झाला. ७ विकेट्सने आरसीबीने पंजाबचा पराभव केला. पंजाबच्या १५८ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूकडून विराट कोहलीने ७३ रन्सची उत्तम खेळी केली. याशिवाय देवदत्त पडिक्कलनेही ६१ रन्स केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.