MI vs CSK : मुंबई विरूद्ध चेन्नई सामन्यातवर पावसाचं सावट? पाहा कसं असणार आहे मुंबईतील आजचं हवामान

MI vs CSK Weather Pitch: आज संध्याकाळी आयपीएलमध्ये ३८ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने येणार आहेत. वानखेडे मैदानावर हा सामना होणार आहे.
MI vs CSK Weather Pitch
MI vs CSK Weather Pitchsaam tv
Published On

आज आयपीएलमध्ये एल क्लासिको रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलमधील हा ३८ वा सामना असणार आहे. यापूर्वी दोन्ही टीम्स चेपॉकच्या स्टेडियमवर भिडल्या होत्या. त्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता.

यंदाच्या सिझनच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आज वानखेडेच्या मैदानावर उतरणार आहे. या सामन्यादरम्यान हवामान कसं असणार आहे तसंच पाऊस आजच्या सामन्यात खेळ करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

MI vs CSK Weather Pitch
World cup : जिंकूनही हरले...! वेस्टइंडीजचं नशीबच फुटकं; रन-रेटमुळे भंगलं वर्ल्डकपचं स्वप्न, भर मैदानात धायमोकलून रडल्या खेळाडू

मुंबईमध्ये कसं आहे आज हवामान?

क्रिकेट प्रेमींसाठी आज आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यादरम्यान हवामान साफ असणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नाही. म्हणून चाहते पूर्णपणे या सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. आज रात्री तापमान ३० डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

कोणाचं पारडं जड?

मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत ३८ वेळा सामने रंगले आहेत. यामध्ये मुंबईने २० वेळा बाजी मारली आहे. तर चेन्नईच्या टीमने १८ वेळा सामने जिंकले आहेत. आकडे पाहता मुंबईचं पारडं जड दिसून येतंय. मात्र याच सिझनमध्ये गेल्या सामन्यात चेन्नईचे मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

MI vs CSK Weather Pitch
Playoff Rules: प्लेऑफ गाठण्यासाठी किती पॉईंट्सची गरज? पाहा कसं आहे समीकरणं, कोणती टीम दावेदार?

कशी असू शकते दोन्ही टीम्सची प्लेईंग ११

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा, रियान रिक्लेटन (विकेटकीपर), विल जॅक्स, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

MI vs CSK Weather Pitch
Vaibhav Suryavanshi : आऊट झाल्यानंतर १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला अश्रू अनावर; डोळे पुसत पोहोचला पव्हेलियनमध्ये, Video व्हायरल

चेन्नई सुपर किंग्ज

शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), जॅमी ओवरटन, मथिशा पथिराना, खलील अहमद, अंशुल कंबोज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com