Virat kohli Viral VIdeo Clip Saam TV
क्रीडा

Virat kohli Viral Clip : मैदानात 'जय सिया राम...' लागताच विराटने जोडले हात, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल; भाजपनेही केलं ट्वीट

प्रविण वाकचौरे

Virat Kohli Viral Video :

भारत आणि  दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये बुधवारी झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली. पहिली कसोटी एक डाव आणि ३२ धावांनी गमावली होती. टीम इंडियाला सामना बरोबरीत आणण्यासाठी मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी जिंकणे आवश्यक आहे. दुसऱ्या कसोटी टीम इंडियाने दमदार सुरुवात करत दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ५५ धावांवर रोखला. मोहम्मद सिरारने ६ विकेट्स घेतल्या.

सामन्यादरम्यान घडलेली आणखी एक घटना सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे 'राम सिया राम' गाण्यावर विराट कोहली धनुष्यबाणासह पोज देताना दिसला. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.  (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेची सहावी विकेट पडली. त्यानंतर केशव महाराज फलंदाजीला आला होता. केशव महाराज जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा अनेकदा 'जय सिया राम...' हे गाणे वाजवले जाते. दुसऱ्या कसोटीतही हे गाणं वाजलं, मात्र चर्चा विराटची झाली.

'जय सिया राम...' हे गाणं वाजताच विराटच्या चेहऱ्यावर हसू आलं. विराट कोहली हे गाणं वाजल्यानंतर धनुष्यबाण पोज देताना दिसला. नंतर विराट नमस्कार करतानाही दिसत आहे. विराटचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भाजपचं ट्वीट

विराट कोहलीचा हा व्हिडीओ महाराष्ट्र भाजपने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT