virat kohli statement after rcb vs pbks match royal challengers bangalore vs punjab kings ipl 2024 amd2000 twitter
Sports

Virat Kohli, IPL 2024: सामना जिंकला, सामनावीर पुरस्कारही जिंकला तरीही विराट नाराज? कारण काय?

Virat Kohli Statement,IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.

Ankush Dhavre

Virat Kohli Statement, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा या हंगामातील पहिलाच विजय आहे. या विजयात विराट कोहलीने मोलाचं योगदान दिलं. दरम्यान सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

या सामन्यात विराटने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. दरम्यान या खेळीच्या बळावर त्याने ऑरेंज कॅपवर नाव कोरलं आहे. ही कॅप आणि सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विराट म्हणाला की,' आत्ताच उत्साही होऊ नका,कारण आतापर्यंत केवळ २ सामने झाले आहेत. ऑरेंज कॅप मिळवण्याचं महत्व मलाही माहित आहे. लोकं खेळाबद्दल खूप चर्चा करतात. मात्र दिवसाच्या शेवटी तुम्ही आकडेवारी, यश आणि विक्रम यांच्याबद्दल चर्चा करत नाही. तर तुम्ही तयार केलेल्या आठवणींबद्दल चर्चा करता, असं राहुल द्रविड म्हणतात. प्रेम,मैत्री, कौतुक, पाठिंबा हेच महत्वाचे आहे आणि जे तुम्ही कधीच विसरत नाही.' (Cricket news in marathi)

तसेच तो पुढे म्हणाला की, ' टी-२० क्रिकेटमध्ये मी सलामीला फलंदाजी करण्यासाठी येत असतो. त्यामुळे डावाची सुरुवात करताना संघाला आक्रमक सुरुवात करुन देण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र जेव्हा विकेट्स जातात, तेव्हा परिस्थितीनुसार खेळावं लागतं.'

टी-२० क्रिकेटबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की, ' जेव्हाही टी-२० क्रिकेटची गोष्ट येते तेव्हा माझं नाव टी-२० क्रिकेटचा प्रचार करण्यासाठी वापरलं जातं. मला वाटतं की, माझ्यात अजूनही ते कौशल्य आहे.' काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरु होती की, टी-२० वर्ल्डकपसाठी विराटला भारतीय संघात संधी मिळणार नाही. मात्र रोहितने जय शाहकडे, मला विराट संघात हवा आहे अशी मागणाी केली होती. त्यामुळे विराट आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT