virat kohli twitter
Sports

Virat Kohli Practise: रणजी ट्रॉफीआधी विराटचा खास सराव! माजी प्रशिक्षक करतोय मदत -VIDEO

Virat Kohli Viral Video: भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली रणजी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान तो सराव करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या फलंदाजीत संघर्ष करताना दिसतोय. आधी न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतही विराटची बॅट शांत राहिली.

अनेक दिग्गजांनी विराटला रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. आता बीसीसीआयने रणजी क्रिकेट खेळणं सक्तीचं केल्यानंतर विराट रणजी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल १२ वर्षांनंतर विराट रणजी ट्रॉफी खेळताना दिसून येणार आहे.

दरम्यान मैदानात उतरण्यापूर्वी विराट कसून सराव करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

संजय बांगरसोबत विराटचा खास सराव

विराट रणजी ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान दिल्लीकडून खेळण्यापूर्वी विराट नेट्समध्ये सराव करताना दिसून आला आहे. विराट संजय बांगर यांच्याकडून मार्गदर्शन घेताना दिसून आला आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये तो ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर बाद झाला आहे. त्यामुळे तो ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंचा सराव करताना दिसून आला. यासह बॅकफूटवर खेळताना दिसून आला. संजय बांगर त्याला फलंदाजीच्या टिप्स देताना दिसून येत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंचा सराव करताना दिसून येत आहे. ऑफ साईडच्या बाहेर जाणारे चेंडू हा विराटचा विक पॉईंट ठरतोय. बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान तो ९ पैकी ८ वेळेस तो ऑफ साईडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर बाद झाला होता.

त्याने पहिल्या कसोटीत शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे बॉर्डर गावसकर मालिका ३-१ ने गमवावी लागली.

विराट कोहलीचा मोठा निर्णय

संजय बांगर यांना प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव आहे. ते २०१४ ते २०१८ दरम्यान भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. या कालावधीत विराट तुफान फॉर्ममध्ये होता. यासह दोघांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी देखील एकत्र काम केलं आहे. आता संजय बांगरांचा सल्ला विराटला कामी येतो का, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT