Virat Kohli News X
Sports

Virat Kohli : आरसीबीने सामना जिंकला, ऑरेंज कॅप मिळवूनही विराट उदास दिसला; नेटकऱ्यांनी अवनीत कौरशी लावलं कनेक्शन

Virat Kohli News : नेहमीच सेलिब्रेशन मोडमध्ये असणारा विराट कोहली काल बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर शांतपणे एकटाच बसला असल्याचे पाहायला मिळाले. विराटच्या या वर्तनामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Yash Shirke

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना काल (३ मे) चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यामध्ये बंगळुरूचा शानदार विजय झाला. अर्धशतकीय खेळी करत विराट कोहलीने काल ऑरेंज कॅप मिळवली. पण ऑरेंज कॅप घेताना आणि सामना संपल्यावरही विराट कोहली शांत असल्याचे पाहायला मिळाले. मैदानामध्ये विराट कोहली खूप जास्त आक्रमकरित्या सेलिब्रेट करतो. पण काल सामना जिंकून ऑरेंज कॅप मिळवूनही विराटने सेलिब्रेशन केले नाही.

विराट कोहली त्याच्या सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. महत्त्वाची विकेट मिळाली, शतक किंवा अर्धशतक ठोकले किंवा सामना जिंकला तर सर्वात आधी विराट कोहली सेलिब्रेशन सुरु करतो. त्याच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. कालच्या बंगळुरू विरुद्ध चेन्नई सामन्यात सेलिब्रेशन न केल्याने विराट कोहलीचे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

यश दयालने सामन्याचा शेवटचा चेंडू टाकला, चेन्नईच्या फलंदाजीनी फक्त १ धाव काढली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय निश्चित झाला. विजयाचा आनंद साजरा करत असताना कोहली शांतपणे मैदानाबाहेर जाताना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. त्यानंतर तो टीमच्या बॉक्समध्ये एकटाच बसला. विराटच्या वागण्याने सर्वांचे लक्ष वेधले.

विराट कोहलीच्या असामान्य वर्तनाचे कनेक्शन काहीजणांनी अभिनेत्री अवनीत कौरशी संबंधित वादाशी जोडले. कोहलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अवनीत कौरचे फोटो लाईक करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणावरुन अनेक मीम्स, ट्रोलिंग पोस्ट व्हायरल झाल्या. ही घटना चुकीमुळे झाल्याचे विराटने स्पष्ट केले. पण कालच्या सामन्यातल्या विराटच्या असामान्य वागण्यामुळे अवनीत कौर प्रकरण पुन्हा चर्चेत आले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी कालचा सामना महत्त्वाचा होता. कालच्या सामन्यात विराटने चांगली फलंदाजी केली. पण क्षेत्ररक्षण करताना विराटने अनेक चुका केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये त्याने महत्त्वाची कॅच सोडली. क्षेत्ररक्षणातील चुकांमुळेही विराट शांत बसला होता, स्वत:वर रागावला होता असेही काहीजणांचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT