virat kohli twitter
Sports

Virat Kohli: विराटच्या जर्सीने खाल्ला भाव! रोहित -धोनीच्या बॅटपेक्षाही लागली मोठी बोली

Virat Kohli Jersey Price In Auction: भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी गरजू मुलांना मदत करण्यासाठी स्टार खेळाडूंनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव केला.

Ankush Dhavre

भारतीय संघातील स्टार फलंदाज केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी नुकताच गरजु मुलांना मदत करण्यासाठी लिलावाचे आयोजन केले होते. या लिलावात खेळाडूंनी वापरलेल्या वस्तू त्यांच्या ऑटोग्राफसह बोली लावण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

या लिलावात विराट कोहलीने रोहित शर्मा आणि एमएस धोनीलाही मागे सोडलं आहे. विराट कोहलीचे ग्लोव्हज आणि जर्सी मिळवण्यासाठी खरेदीदारांनी आपल्या तिजोऱ्या खोलल्या.

विप्ला फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या 'क्रिकेट फॉर चॅरिटी' लिलावात विराट कोहलीच्या जर्सीने चांगलाच भाव खाल्ला. विराटने केएल राहुलला ऑटोग्राफ असलेली वर्ल्डकपची जर्सी दिली होती.

ही जर्सी घेण्यासाठी खरेदीदारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली. या जर्सीवर ४० लाखांची बोली लागली. तर ग्लोव्ह्ज २८ लाखांमध्ये विकले गेले. या लिलावातून केएल राहुलने एकूण १.९३ कोटी रुपये देणगी मिळवली.

रोहित- धोनीवर विराट भारी

भारतात विराट कोहलीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या वस्तू खरेदी करण्याची संधी मिळताच, खरेदीदारांनी मागचा पुढचा विचार केला नाही.

या लिलावात रोहित शर्मा आणि एमएस धोनीची बॅटही होती. मात्र विराटची जर्सी त्याहून महाग विकली गेली. रोहितच्या बॅटवर २४ लाख तर धोनीच्या बॅटवर १३ लाखांची बोली लागली. हे दोन्ही मिळून ३७ लाख रुपये बोली लागली. तर एकट्या विराटच्या जर्सीवर ४० लाख रुपये बोली लागली. जी रोहित आणि धोनीच्या बॅटवर लागलेल्या बोलीपेक्षा ३ लाखाने अधिक आहे.

राहुल द्रविडच्या बॅटलाही लागली मोठी बोली

विराट कोहलीची जर्सी, रोहित आणि धोनीची बॅट हे या लिलावाचे प्रमुख आकर्षण होते. मात्र राहुल द्रविडने वापरलेल्यबॅटनेही चांगला भाव खाल्ला. राहुल द्रविडच्या बॅटवर ११ लाखांची बोली लागली. यासह केएल राहुलच्या टेस्ट जर्सीवर ११ लाख, वर्ल्डकप बॅटवर ७ लाख आणि जसप्रीत बुमराहची वर्ल्डकप जर्सी ८ लाख आणि रिषभ पंतच्या बॅटवर ७ लाखांची बोली लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT