Virat Kohli Latest News| नागपूर: नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी -२० सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीनं आनंद व्यक्त केला आहे. पावसामुळं आठ षटकांचा सामना झाला होता. या सामन्यात भारतानं सहा गडी राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. त्यामुळं तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. तिसरा टी २० सामना हैदराबादमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी २० सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) खास अशी कामगिरी केली नाही. त्याने सहा चेंडूंत ११ धावा केल्या. अॅडम झम्पा याच्या चेंडूवर तो त्रिफळाचित झाला. मात्र, टीमच्या कामगिरीनं तो कमालीचा खूश आहे. त्याने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू अॅपवर टीम इंडियाचा फोटो शेअर केला आहे. हिसाब बराबर, हैदराबादमध्ये भेटूयात, असं कोहलीनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) २० चेंडूंत ४६ धावा केल्या. या जोरावर भारतानं (Team India) दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मैदान ओले असल्याने हा सामना प्रत्येकी आठ षटकांचा खेळवला गेला. मॅथ्यू वेड याने २० चेंडूंत ४३ धावा केल्या. त्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारतासमोर ९१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतानं चार गडी गमावून ९२ धावा केल्या. दिनेश कार्तिकनं अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.
रोहितची कमाल
भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात केलेल्या तुफानी खेळीमुळं विजय मिळवून दिला. तसंच एक अनोखा विक्रमही केला. त्याने न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल याला मागे टाकत टी २० मध्ये सर्वाधिक षटकार लगवणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान गाठले. गप्टिल १७२ षटकारांसह दुसऱ्या, तर वेस्ट इंडीजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल हा १२४ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे. याशिवाय कोहली असा एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याने टी-२० मध्ये शंभराहून अधिक षटकार लगावले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.