Ind Vs Aus : हायव्होल्टेज सामन्यात रोहितनं लावली वाट; टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया पराभूत

नागपूरमध्ये झालेल्या टी २० सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर सहा विकेट राखून विजय मिळवला.
IND vs AUS 2nd T20 Nagpur Latest Update
IND vs AUS 2nd T20 Nagpur Latest Updatesaam tv
Published On

IND Vs AUS 2nd T20 Match At Nagpur | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर नागपुरात झालेल्या दुसऱ्या टी २० लढतीत भारतानं शानदार विजय मिळवला. मैदान ओला असल्यानं उशिरा सुरू झालेल्या आणि प्रत्येकी आठ ओव्हरच्या खेळवल्या गेलेल्या हायव्होल्टेज सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पुरती वाट लावली. २०० हून अधिकच्या स्ट्राइक रेटनं खेळून रोहितनं भारताला सामना जिंकून देत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

नागपूरमध्ये (Nagpur) दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला सहा विकेटनं मात देत मालिकेत जोरदार वापसी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ चार सामने हरल्यानंतर भारतानं हा पहिला विजय मिळवला आहे.

IND vs AUS 2nd T20 Nagpur Latest Update
IND vs Aus : टीम इंडियाचं कुठे चुकलं? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

ओल्या मैदानामुळं उशिरा सुरू झालेला हा सामना प्रत्येकी आठ षटकांचा खेळवला गेला. हा सामना बघण्यासाठी आलेल्या हजारो क्रिकेट (Cricket) चाहत्यांची निराशा झाली होती. कारण हा सामना मुळातच उशिरा सुरू झाला. त्यात तो आठ षटकांचा खेळवण्यात आला. पण चौकार-षटकारांच्या आतषबाजीमुळं चाहत्यांनी हा सामना एन्जॉय केला.

IND vs AUS 2nd T20 Nagpur Latest Update
Team India Jersey : टीम इंडिया टी20 विश्वचषकात दिसणार नव्या अवतारात; जर्सीचा लूक आला समोर

कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) ४६ धावा कुटल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं आठ षटकांत ९१ धावांचं मोठं लक्ष्य टीम इंडियासमोर ठेवलं होतं. रोहित शर्मानं जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात पाऊल ठेवलं आणि पहिल्याच षटकात हेजलवुडला दोन षटकार खेचून हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिलं. पहिल्याच षटकात २० धावा मिळाल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकातही रोहितनं एकेक षटकार खेचला.

कार्तिकनं दिला फिनिशिंग टच

हार्दिक पंड्या देखील काही खास कमाल दाखवू शकला नाही. रोहितनं २० चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ४६ धावा केल्या. टीम इंडियाला शेवटच्या षटकात ९ धावांची गरज होती. दिनेश कार्तिक मैदानात आला. कार्तिकने केवळ दोनच चेंडू खेळले. त्यात एक षटकार आणि एक चौकार खेचून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com