रोहित शर्मा अणि विराट कोहली Twitter
Sports

2011 World Cup: रोहित ऐवजी कोहलीला का मिळाली संधी? युवराजने दिले उत्तर

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आजकाल कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे.

वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आजकाल कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. विराट कोहलीने फलंदाज म्हणून बरेच यश मिळवले असून त्याचा गौरवशाली प्रवास अजूनही चालू आहे. विराटच्या चाहत्यांची कमी नाहीये आणि यात युवराज सिंगचा (Yuvraj Singh) देखील समावेश आहे. आता युवीने विराट कोहलीचे कौतुक केले आणि म्हटले की तो वयाच्या 30 व्या वर्षीही दिग्गज फलंदाज आहे. युवीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत विराट कोहलीच्या प्रवासाविषयी बोलले आहे.

युवराज सिंगने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, 2008 साली जेव्हा तो भारतीय संघात आला तेव्हा त्याने दाखवून दिले की त्याच्यात बरीच क्षमता आहे. संधी मिळताच त्याने संधिचे सोने केले आहे. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक संघात त्याला संधी मिळाली कारण तो खूपच तरुण होता. त्यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात सामना होता, पण कोहलीने बाजी मारली आणि त्याला विश्वचषकाच्या संघात समावेश मिळाला. तो 2008 ते 2011 या कालावधीमध्ये जबरदस्त फॅार्ममध्ये होता. 2011 च्या विश्वचषकानंतर आतापर्यंत त्याच्या खेळण्याच्या शैलीत बराच बदल झाला आहे.

विराट कोहलीबद्दल अधिक बोलताना युवराज सिंग म्हणाला, ''मी माझ्या डोळ्यांसमोर सराव करताना आणि कारकीर्दीत प्रगती करताना पाहिले आहे. तो खूप जास्त परिश्रम घेत असतो. विशेषकरुन तो तंदुरुस्तीबद्दल खूप जागरूक असतो आणि त्याच्या आहाराबद्दल तो खूप शिस्तबद्ध असतो. त्याच्या प्रशिक्षणाबद्दलही तो खूप शिस्तबद्ध असतो.

जेव्हा तो धावा करत असतो तेव्हा त्याला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून पाहिले जाते. जेव्हा तो चांगल्या धावा बनवत होता तेव्हा त्याला संघाचा कर्णधार बनविण्यात आले. कर्णधार झाल्यानंतर विराटने आपल्या आक्रमक खेळ खेळणं कमी केलं होतं. परंतू त्याने धावा बनवणे सुरुच ठेवले आणि त्यामुळेच तो 30 व्या वर्षीच लेजेंड झाला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT